पालघर रेल्वे पोलीसांतर्फे कम्युनिटी पोलीसिंग अंतर्गत होळी व धुलीवंदन सणाच्या अनुषंगाने पालघर रेल्वे पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील बोईसर रेल्वे स्टेशन ट्रॅक नजीक असलेल्या झोपडपट्टीमध्ये जनजागृती..
प्रतिनिधी-मंगेश उईके
पालघर:– आगामी होळी, धुलीवंदन सणाच्या अनुषंगाने आज दिनांक 23/03/2024 रोजी पालघर रेल्वे पोलीस ठाणे हद्दीतील * बोईसर रेल्वे स्टेशन पुर्व बाजुस रेल्वे ट्रॅक नजीक शहर पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या झोपडपट्टी,बोईसर येथे होळी , धुलीवंदन सणाच्या अनुषंगाने जातीय सलोखा ( मोहल्ला कमिटी ) ची बैठक आमच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक/मुडावदकर , गोपनिय शाखेचे पोहवा/2860 मोर ,स्टेशन ड्युटीवरिल पोलीस अंमलदार व होमगार्ड यांच्यासह 17.30 ते 18:15 वाजेपर्यंत बैठक घेऊन तसेच झोपडपट्टीमध्ये फिरून खालील प्रमाणे जनजागृती पर सूचना देण्यात आलेल्या आहेत .

1) आगामी होळी /धुलीवंदन या सणाच्या” अनुषंगाने , होळी दिवशी , होळी ही रेल्वे ट्रॅक पासून दूर अंतरावर पेटवावी तसेच सदर सणाच्या कालावधीत रेल्वे ट्रॅक परिसरात, धावत्या लोकल व मेल/ एक्सप्रेस गाडीवर रंगाने भरलेले फुगे अथवा तत्सम वस्तू लहान मुलांकडून फेकली जाणार नाही याची पालकांनी दक्षता घ्यावी . असे कृत्य केल्याने काय दुष्परिणाम होतात व कायदेशीर कारवाई काय केली जाते याबाबत उपस्थित नागरिक व मुलांना माहिती देऊन कोणीही रेल्वे ट्रॅक नजीक रंगपंचमी खेळणार नाही याची सर्वांनी दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले.

2) तसेच अशा प्रकारचे कृत्य करताना कोणी दिसून आल्यास त्याची तात्काळ माहिती रेल्वे पोलीस हेल्पलाइन 1512,139 किंवा शहर पोलीस ठाणे हेल्पलाइन नंबर 100,112 वर कळवणे बाबत सूचना देण्यात आली.

3) तसेच INPUTS च्या अनुषंगाने दक्ष व सतर्क राहण्याच्या सूचना देऊन रेल्वे ट्रॅक परिसरात कोणी संशयित किंवा हालचाली दिसून आल्यास त्याची माहिती तात्काळ पालघर रेल्वे पोलीस ठाणे,बोईसर रेल्वे स्टेशन ड्युटीवरिल पोलीस अंमलदार अगर रेल्वे पोलीस हेल्पलाइन नंबर 1512,139 किंवा शहर पोलीस हेल्पलाइन नंबर 100,112 वर कळविण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत.
4) तसेच सध्या मुस्लिम बांधवांचा रमजान महिना सुरू असून सणासुदीच्या काळात कोणतेही गालबोट लागेल असे कोणतेही कृत्य करू नये. सर्वांनी जातीय सलोखा राखून बंधू भावाने एकोप्याने सण साजरा करावीत. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. असे आवाहन करण्यात आले.
सदर जातीय सलोखा ( मोहल्ला कमिटी ) बैठक व जनजागृती झोपडपट्टी,बोईसर मधील 20 ते 25 स्त्री-पुरुष व लहान मुले असे उपस्थित होते. सदर उपस्थित रहिवाशी यांना आपले भागातील नागरिकांनाही वरील सूचना कळविणे बाबत आवाहन करण्यात आलेले आहे.
अशी माहिती श्री सचिन इंगवले वरिष्ठ पोलीस निरीक्षक पालघर रेल्वे पोलीस ठाणे यांनी दिली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com