पालघर पोलीसांनी घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपीस केले अटक..!

उपसंपादक : मंगेश उईके
पालघर पोलीस ठाणे हद्दीमध्ये दिनांक १२/०७/२०२५ रोजी ते दिनांक १३/०७/२०२५ रोजीचे ०७.३० वा दरम्यान फिर्यादी नामे तुलसी बाबुलाल जोशी, वय ४८ वर्षे, रा. शिवकला कुंज, रूम. नं.०२, पहिला मजला, भाजीमार्केट जवळ, पालघर ता. जि. पालघर यांचे हेमलता नावाचे किराणा दुकानाचे शटरचे कोणीतरी अज्ञात चोरटयाने लॉक तोडुन आतमध्ये प्रवेश करुन दुकानाचे गल्ल्यातील रोख रक्कम तसेच रुम नं २०१, शत्रुंजय अपार्टमेंट, पालघर या घराचे मुळ कागदपत्र असे मुद्देमालाची घरफोडी चोरी केली म्हणुन पालघर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. १ २०३/२०२५ भा.न्य.सं. कलम ३०५ (अ), ३३१(४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक, पालघर श्री. यतिश देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पोनि/प्रदिप पाटील, स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांनी तपास पथक तयार करून पथकास तपासाबाबत सुचना दिल्या. त्यानुसार दि. १८/०७/२०२५ रोजी तांत्रीक विश्लेषन व गोपनीय बातमीदार यांचे मदतीने सदर गुन्ह्यात आरोपी निष्पन्न करून तो पालघर रेल्वे परिसरात येणार असल्याबाबत खात्रीलायक माहिती मिळाल्याने त्यास सापळा लावून ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने त्याचे नाव राहुल ओमप्रकाश तोमर, वय ३१ वर्षे, रा. गल्ली नं. ४, गणपत पाटील नगर, बोरीवली पश्चिम, मुंबई, मुळ रा. गोकुळगाव, मथुरा, राज्य उत्तरप्रदेश असे सांगितले. त्याने सदरचा गुन्हा त्याचा साथीदार शंकर उर्फ टकला, रा. भायंदर याचे सोबत केल्याचे कबुल केले. सदर आरोपीस अटक केली असून पुढील तपास हा पोउपनि/अविनाश वळवी, नेमणुक पालघर पोलीस ठाणे हे करीत आहेत.
सदरची कारवाई ही श्री. यतिश देशमुख, पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. विनायक नरळे, अपर पोलीस अधीक्षक, पालघर यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री. प्रदिप पाटील, पोउपनि/स्वप्नील सावंतदेसाई, पोहवा/८६६ दिनेश गायकवाड, पोहवा/८१५ कैलास पाटील, पोहवा/९२१ भगवान आव्हाड, पोअं/१२९८ विशाल कडव सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांनी केलेली आहे.