पालघर पोलीस दल वाहतूक शाखा आणि नगर परिषद यांच्या कडून सोमवारपासून नो-पार्किंग झोन, पी१-पी २ ची होणार उपाययोजना…!

पालघर :
दि. ४/२/२०२५ रोजी पालघर शहरातील वाहतूक कोंडीची
समस्या दूर करण्यासाठी पालघर पोलिस दल आणि नगर परिषद यांनी एकत्र येत संयुक्तरीत्या मंगळवारी बैठक घेतली. सोमवारपासून शहरात नो-पार्किंग झोन, हॉकर्स झोन आणि पी वन, पी टू प्रकारे पार्किंगची उपाययोजना राबविण्याचे यात निश्चित केले आहे. गर्दीचा भाग असलेला पालघर रेल्वे स्टेशन ते हुतात्मा स्तंभापर्यंत दोन्ही बाजूंचा भाग नो-पार्किंग झोन जाहीर केला आहे, त्यामुळे पालघर शहरातील वाहतूक कोंडीला आळा बसणार आहे.



पालघर शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पालघर उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजित धाराशिवकर, पालघर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अनंत पराड, जिल्हा वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी सुरेश साळुंखे आणि पालघर नगर परिषदेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांनी कंबर कसली आहे.
पालघरमधील वाहतूककोंडीला आळा घालण्याच्या दृष्टीने नियोजन.
१ पालघर नगर परिषद येथील काही रस्त्यांवर पार्किंग झोन, नो हॉकर्स झोन, पी वन पी टू झोन घोषित करणे यासाठी जिल्हा वाहतूक शाखेने पालघर नगर परिषदेला पत्र दिले आहे. हनुमान मंदिर ते रेल्वे स्टेशन रेल्वे स्टेशन ते जगदंबा नाका पाच बत्ती ते सरकारी हॉस्पिटल अशा मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतुकीच्या समस्या निर्माण होत असल्याने अनेक तक्रारी प्राप्त होत होत्या.
२ पालघर शहरातून कामाकरिता बाहेर जाणारे नागरिक आपल्या दुचाकी मुख्य रस्त्याच्या बाजूस पार्किंग करून कामावर निघून जातात. बहुतांश नागरिक हे सायंकाळी उशीरा कामावरून परततात. तोपर्यंत त्यांची वाहने तिथेच असतात. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा दिवसभर दुचाकी उभ्या असलेल्या पाहायला मिळतात. परिणामी रस्ता वाहतुकीसाठी अरुंद होत होता आणि वाहतूककोंडीत १००हून अधिक तक्रारी वाहतुकीच्या समस्येबाबत आल्या होत्या. या बैठकीत रिक्षा युनियनचे पदाधिकारी रोडवर हातगाड्या लावणारे विक्रेते सहभागी झाले होते. त्यांनीही वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी सहकार्य करण्याचे सांगितले.
3 दुसरीकडे अनेक विक्रेते आपल्या हातगाड्या रोडवर लावून व्यवसाय करतात, तर अन्य भागांत भाजीपाला विक्रेते, फळविक्रेते, चायनीज विक्रेते यांच्या हातगाड्यामुळे पालघर शहरातील रस्ते अरुंद होत वाहतूक कोंडीची समस्या वाढली होती. पालघर नगर परिषदेने या वाहतूक कोंडीला आळा घालण्यासाठी ठराव पारित केले आहेत.
नो-पार्किंग झोन
पालघर रेल्वे स्टेशन ते आयडीबीआय बँकपर्यंत दोन्ही बाजूस
हुतात्मा स्तंभ ते धनानी मेडिकल
पालघर रेल्वे स्टेशन ते कोटक महिंद्रा बँकपर्यंत (रस्त्याच्या डावी बाजू)
नो-हॉकर्स झोन
पालघर रेल्वे स्टेशन ते आयसीआयसीआय बँकपर्यंत रोडच्या दोन्ही बाजूस
पालघर रेल्वे स्टेशन ते कोटक
महिंद्रा बँकपर्यंत रोडचे दोन्ही बाजूस
हुतात्मा स्तंभ ते ग्रामीण रुग्णालय दवाखाना
पी १पी २-
सम-विषम पाकिंग
धनानी मेडिकल ते ग्रामीण रुग्णालय दवाखान्यापर्यंत
आयडीबीआय बँक ते आयसीआयसीआय बँक
पी १ पी २-
सम -विषय पार्किंगवर उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत धाराशिवकर, यांच्या ऑफिसला मंगळवारी ४/२/२०२५ रोजी चर्चा संपन्न झाली.