दोन जेष्ठ नागरीकांचा खुन करुन पळुन गेलेल्या आरोपीला अटक करण्यात पालघर पोलीसांना मोठे यश..

प्रतिनिधी-मंगेश उईके
पालघर:-
दिनांक २९/०२/२०२४ रोजी फिर्यादी अजित मुकुंद पाटील, वय- ५६ वर्षे, रा. मु. पो. मोठी कुडण, ता. जि. पालघर, यांचे वडील श्री. मुकुंद विठोबा पाटील, वय ९२ वर्षे, हे मोठे कुडण येथील त्यांचे चिकुचे वाडीमध्ये फेरफटका मारण्यासाठी सायंकाळी १८.३० वा. चे पुर्वी गेले होते व ते अंधार पडला तरी घरी आले नाही म्हणुन फिर्यादीचे चुलते भिमराव विठोबा पाटील, वय ८४ वर्षे, हे त्यांना पाहण्यासाठी गेले असता यातील आरोपीत नामे किशोरकुमार जगनाथ मंडल वय ३० वर्षे रा. शिवाजीनगर, बोईसर ता. जि. पालघर मुळ रा. शब्दा, पोठिया जिल्हा कटिहार राज्य-बिहार याने अज्ञात कारणा वरुन त्याचे कडील लोखंडी कुदळीने दोन्ही मयत यांचे डोक्यावर वार करुन निघृणपणे जिवे ठार मारले बाबत तारापुर पोलीस ठाणे येथे फोनद्वारे माहिती प्राप्त झालेली होती.
सदरच्या माहितीचे गांभीर्य लक्षात घेऊन श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर श्री. पंकज शिरसाट, अपर पोलीस अधीक्षक, पालघर, यांच्या आदेशान्वये व मार्गदर्शनाखाली, श्री. विकास नाईक, उप विभागीय पोलीस अधिकारी, बोईसर यांचे मार्गदर्शनाखाली श्री. शिरीष पवार, पोलीस निरीक्षक, बोईसर पोलीस ठाणे, श्री. अनिल विभुते, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, पालघर, सपोनि/पाचपुते, प्रभारी अधिकारी, वाणगाव पोलीस ठाणे, सपोनि/सागर कावळे, प्रभारी अधिकारी, तारापुर पोलीस ठाणे असे तात्काळ घटनास्थळी हजर झाले व कुडण व आजुबाजुच्या गावातील स्थानिक ग्रामस्थ आणि पोलीस अशी वेगवेगळी पथके तयार करुन जंगल परीसरात त्याचा शोध घेण्यास सुरवात केली. जंगलात बराच शोध घेवुन झाल्यावर तारापुर खाडीकडे शोध घेताना सपोनि /सतिश आस्वर, पोना/अंभिरे, पोअं/धानिवरे, पोअं/खेडकर,नेम.बोईसर पोलीस ठाणे, पोअं/राखोंडे, पोअं कुमटकर, आर.सी.पी पालघर, पोअं/मोरे, पोअं/बजगुडे नेम. स्ट्रायकींग बोईसर व इतर १० ते १५ ग्रामस्थ यांचे पथकास खाडीतुन एक इसम उडी मारुन पोहुन पलीकडे पळुन जाण्याचा प्रयत्न करीत जात असतांना दिसला. सपोनि /सतिश आस्वर, पोना/अंभिरे यांनी त्याच्या पाठोपाठ पाण्यात उडी मारुन त्यास इतर टिमचे सदस्य व ग्रामस्थ यांचे मदतीने पाण्यातून बाहेर काढले.

सदर इसमाच्या नाका तोंडात चिखल गेलेला होता व अंगावरही जखमा झालेल्या होत्या. त्यामुळे त्यास पुढील दवाउपचार कामी प्राथमिक आरोग्य केंद्र, तारापुर येथे दाखल करण्यात करण्यात आले. सदर घटनेबाबत तारापुर पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. १४/२०२४ भा. द. वि. सं. कलम ३०२ प्रमाणे दिनांक ०१/०३/२०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर आरोपी यास दिनांक ०२/०३/२०२४ रोजी सदर गुन्हयात अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचा तपास श्री विकास नाईक, उपविभागीय पोलीस अधिकारी, बोईसर हे करीत आहेत.

सदरची कामगीरी ही श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. पंकज शिरसाठ, अपर पोलीस अधीक्षक, पालघर यांचे आदेशान्वये श्री. विकास नाईक, उपविभागीय पोलीस अधिकारी बोईसर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली श्री. शिरीष पवार, पोलीस निरीक्षक, बोईसर पोलीस ठाणे, श्री. अनिल विभुते, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, पालघर, सपोनि/सागर कावळे, प्रभारी अधिकारी, तारापुर पोलीस ठाणे, सपोनि/पाचपुते, प्रभारी अधिकारी, वाणगाव पोलीस ठाणे, सपोनि / सतिश आस्वर, नेम. बोईसर पोलीस ठाणे, पोना/अंभिरे, पोअं/धानिवरे, पोअं/खेडकर नेम तारापुर पोलीस ठाणे, पोअं/राखोंडे,पोअं कुमटकर, पोअं/बागुल, पोअ/वसेकर आर.सी.पी पालघर, पोअं/मोरे, पोअं/ बजगुडे, पोअं/ चव्हाण, पोअं/आरेकर, पोहवा / वाघ, सफौ दुसाने, सफौ. म्हसकर, पोअं पाटील/ पोअं-केंद्रे बोईसर स्टायकींगचे अंमलदार यांनी यशस्वीरीत्या पार पाडली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com