विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्या आरोपींवर पालघर पोलीस दलाकडून कारवाई…!

उपसंपादक : मंगेश उईके
पालघर :-आगामी सार्वत्रीक विधानसभा निवडणुक २०२४ चे अनुषंगाने दिनांक १५/१०/२०२४ रोजी पासून संपूर्ण महाराष्ट्रात आदर्श आचारसहिता लागू करण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक पालघर यांनी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखा पालघर यांना पालघर जिल्हयात चालणारे अवैध धंदे, विनापरवाना अग्नीशस्त्र बाळगणारे इसम यांचेविरूध्द कारवाई करण्याबाबत सुचना दिलेल्या आहेत. त्याअनुषंगाने दिनांक १६/११/२०२४ रोजी जिल्हयात ऑल आऊट ऑपरेशन आयोजित करण्यात आले होते. सदर ऑल आऊट ऑपरेशन दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा पालघर व तलासरी पोलीस ठाणे यांचेकडून अवैध अग्निशस्त्र बाळगणा-या इसमांवर खालीलप्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे.

स्थानिक गुन्हे शाख्खा पालघर यांना मनोर पोलीस ठाणे हद्दितील मौजे सातिवली गावचे हद्दीत जंगलात एका इसम यांचे ताबे कब्जात विनापरवाना अग्निशस्त्र असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली. सदर माहितीच्या अनुषंगाने दि. १६/११/२०२४ रोजी १७.५० वा. चे सुमारास नमुद ठिकाणी छापा कारवाई केली असता आरोपी मारवत कान्हा धोडी, वय-४७ वर्षे, व्यावसाय शेती, रा. जायशेत ठाकुरपाडा, पो. ढेकाळे, ता.जि. पालघर याचे ताब्यात एक ठासणी बंदुक त्यास अंदाज ३ फुट लांबीची लोखंडी नळी तिस लाकडी बट व लोखंडी घोडा ट्रिगर व कडी असा एकुण १०,०००/- रु. किमंतीचे घातक शस्त्र विनापरवाना जवळ बाळगले असतांना मिळुन आल्याने नमुद इसमास ताब्यात घेवुन, त्याचे ताब्यातील घातक हत्यारे जप्त करण्यात आली आहेत. नमुद इसमाचे विरुध्द मनोर पोलीस ठाणे गु.र.नं. ३७४/२०२४ भारतीय हत्यार अधिनियम कलम ३, २५ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) प्रमाणे गुन्हा दाखल आहे. गुन्हयाचा तपास पोलीस उप निरीक्षक विशाल शिर्के, नेम. मनोर पो. ठाणे हे करीत आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com