पालघर पोलीस ठाणे हद्दीत जेनीसेस कोळगाव या ठिकाणी असलेल्या ईबको कंपनीमध्ये जनजागृती बैठकीचे आयोजन संपन्न

उपसंपादक-मंगेश उईके
पालघर



पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील तसेच पालघर जिल्हा अप्पर अधीक्षक विनायक नरळे यांनी सुरू केलेल्या जनसंवाद अभि,यान योजनेच्या अनुषंगाने पालघर पोलीस निरीक्षक अनंत पराड यांनी पालघर जेनेसिस इबको कंपनीचे मॅनेजर व स्टाफ यांना नवीन कायद्याबाबत मार्गदर्शन तसेच सायबर क्राईम, डायल ११२, तसेच लैंगिक अत्याचार या विषयाबाबत मार्गदर्शन करण्यात आले तसेच विविध विषयांवर त्यांच्या बरोबर जनसंवाद साधून मार्गदर्शन केले. तसेच नवीन कायद्याबाबत शंका अडीअडचणी जाणून घेऊन त्यांचे निरसन करण्यात आले आहे. तसेच या कार्यक्रमाकरिता कंपनीचे 250 ते 300 कर्मचारी उपस्थित होते.