अवैधरित्या दारूची वाहतुक करणाऱ्या आरोपीवर पालघर पोलीसांकडून कारवाई..

प्रतिनिधी-मंगेश उईके
पालघर:- आगामी लोकसभा निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने पालघर जिल्हयामधील अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन करणेकरीता श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांना सुचना दिल्या होत्या. दिलेल्या आदेशावरुन श्री. पंकज शिरसाट, अपर पोलीस अधीक्षक, पालघर व पोनि / अनिल विभुते, प्रभारी अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांनी पोलीस पथक तयार करुन अवैध धंद्यांची माहिती घेवुन कार्यवाही करणेकरीता मार्गदर्शन व सुचना केल्या होत्या.
दि.११/०३/२०२४ रोजी मुंबई – गुजरात वाहिनीवरुन गुजरात बाजुकडे ट्रक क्र. युपी-८६-टि-६६४५ मधुन प्रोव्हिबिशन गुन्हयाचे मालाची वाहतुक होणार आहे अशी गुप्त बातमी पोलीस अंमलदार/१६० योगेश नामदेव मुंढे नेम- तलासरी पोलीस ठाणे यांना मिळाल्याने वरीष्ठांचे आदेशाने दापचरी चेक पोस्ट येथे सापळा रचुन युपी – ८६ – टि – ६६४५ हा ट्रक ताब्यात घेतला असता. त्यावरील चालकाने अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेला. मिळुन आलेल्या ट्रक क्रमांक युपी – ८६ – टि-६६४५ मध्ये एकुण ९१, ७२,४६४/- रुपये किंमतीचा विदेशी दारुचा साठा मिळुन आला असुन एकुण १,०६,७२,४६४ /- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदरबाबत तलासरी पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. ९७/२०२४ भादंविसं कलम ४२०, ४६५, ४६८, ४७१, सह महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (अ), (ई) प्रमाणे दि. ११/०३/२०२४ रोजी गुन्हा दाखल केला असुन गुन्हयाचा अधिक तपास पोउनि / गणपत सुळे, स्थानिक गुन्हे शाखा, पालघर हे करीत आहेत.
सदरची कामगिरी हि श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. पंकज शिरसाट, अपर पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. विकास नाईक, उपविभागीय पोलीस अधिकारी, बोईसर विभाग,(अतिरिक्त कार्यभार डहाणू विभाग) यांचे मार्गदर्शनाखाली पोनि / अनिल विभुते, प्रभारी अधिकारी स्थानिक गुन्हे शाखा, पालघर, सपोनि / हेमंत देवरे, पोउनि / कुणाल चौधरी, पोउनि / एन. के. पाटील, पोहवा/वांगड, पोहवा/भोसले, पोलीस अंमलदार / योगेश मुंढे सर्व नेमणूक तलासरी पोलीस ठाणे, पोउनि / गणपत सुळे, पोहवा / संतोष निकोळे, पोहवा / संजय धांगडा, पोलीस अंमलदार / प्रशांत निकम, पोलीस अंमलदार/बजरंग अमनवाड, पोलीस अंमलदार / संदीप राजगुरे, सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांनी उत्कृष्टरित्या पार पाडली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com