पालघर पोलीस ठाणे येथे दाखल घरफोडी चोरीचा गुन्हा उघड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेस यश..!

उपसंपादक : मंगेश उईके
पालघर :-दि.२४/०९/२०२४ रोजी दुपारी १३.१५ ते १५.०० वाजण्याचे दरम्यान फिर्यादी सोएब अकबर शेख यांचे महावीर निधी रुम नं.२०६ साई रेसिडेन्सी पालघर यांचे राहते घराचे बंद दरवाजाचे कोणीतरी अज्ञात चोरटयाने कड़ी कोंडा तोडून, आत प्रवेश करून, फिर्यादी यांनी कपाटात ठेवलेले २१,०००/-रु किंमतीचे ६.२८० ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण फिर्यादीचे संमती शिवाय लबाडीच्या ईराद्याने स्वतःचे आर्थिक फायद्याकरीता चोरी करुन चोरुन नेले आहे. याबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पालघर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. १९३/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३०५ (अ), ३३१ (३) प्रमाणे दि. २४/०९/२०२४ रोजी गुन्हा दाखल आहे.

सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, विनायक नरळे, अपर पोलीस अधीक्षक, पालघर यांनी मार्गदर्शन करून पोनि/ प्रदिप पाटील, स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांना तपास पथक तयार करून तपासाबाबत सुचना दिल्या. त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस तपास पथक तयार करून सदर पोलीस पथकाने गुन्हयाचे घटनास्थळी भेट देवून, गुन्हयाची माहिती घेवुन, तांत्रीक स्वरुपाचे मदतीने व गोपणीय माहितीच्या आधारे सदरचा गुन्हा करणारा आरोपी शफिक अब्दुल शेख ऊर्फ टोपी, वय ४६ वर्षे, रा. काप तलावाचे बाजुला, क्वार्टर गेटच्या पाठीमागे, घुंगटनगर भिवंडी ता. भिवंडी जि. ठाणे यास जुचंद्र ता. वसई येथुन दि.०४/१०/२०२४ रोजी ताब्यात घेवून त्याचेकडे कसून चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. त्यास सदर गुन्हयात अटक करण्यात आली आहे. सदर आरोपीकडे अजून कसून चौकशी केली असता त्याने यापूर्वी रबाळे पोलीस ठाणे, नवी मुंबई एपीएमसी पोलीस ठाणे, कासारवडवली पोलीस ठाणे, जि. ठाणे, दानीदमण पोलीस ठाणे, दमण येथे एकुण १७ मालमत्तेचे गुन्हे केल्याची कबुली दिलेली आहे.
सदरची कारवाई बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक पालघर, विनायक नरळे, अपर पोलीस अधीक्षक पालघर यांचे मार्गदर्शनाखाली पोनि/प्रदिप पाटील, स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांचे सुचनांप्रमाणे पोउनि/रोहीत खोत, पोउनि/रविंद्र वानखेडे, पोहवा/दिनेश गायकवाड, पोहया/कैलास पाटील, पोहवा/संजय धांगडा, पोअमं/विशाल नांगरे सर्व नेम. स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांनी केलेली आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोहवा /१९७ चंद्रकांत सुरुम नेम. पालघर पो. ठाणे हे करीत आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com