पालघर पोलीस दलाकडून “मुद्देमाल हस्तांतरण” कार्यक्रमाचे आयोजन तसेच बोईसर शहरात बसविण्यात आलेल्या CCTV कॅमेऱ्यांचे उद्घाटन…!

उपसंपादक : मंगेश उईके
पालघर.दिनांक २२/०१/२०२५ रोजी संजय दराडे, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र, नवी मुंबई यांचे शुभहस्ते टिमा हॉल, बोईसर येथे “मुद्देमाल हस्तांतरण” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सन २०२३ व २०२४ या वर्षामध्ये पालघर जिल्हयातील वेगवेगळ्या पोलीस ठाणेचे हद्दित दरोडा, जबरी चोरी, फसवणूक, घरफोडी चोरी, चोरी या शिर्षाखाली दाखल गुन्हयांमध्ये १७३ मोबाईल, १७ मोटार सायकल, ४ चारचाकी वाहने, सोन्या-चांदिची दागिने तसेच रोख रक्कम असा सुमारे २,००,०२,२३८ रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. त्यापैकी आयोजित करण्यात आलेल्या “मुद्देमाल हस्तांतरण” कार्यक्रमामध्ये संजय दराडे, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र, नवी मुंबई यांचे शुभहस्ते ८६,१०,६४४/- रुपये किंमतीचा हस्तगत मुद्देमाल न्यायालयाचे आदेश घेऊन वेगवेगळ्या पोलीस ठाणे हद्दित दाखल गुन्हयांतील एकूण १८ फिर्यादी यांना परत करण्यात आलेला आहे.सदर कार्यक्रमात जिल्हयातून आलेले वेगवेगळया गुन्हयांतील फिर्यादी यांनी त्यांची चोरीस गेलेली मालमत्ता परत मिळालेबाबत समाधान व्यक्त करुन पोलीसांचे आभार मानले आहेत.त्याचप्रमाणे तारापुर इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चर असोशिएशन (TIMA) यांचे मार्फतीने उच्च प्रतीचे एकूण ५४ CCTV कैमेरे बोईसर शहरात विविध ठिकाणी लावण्यात आले आहेत. त्यातील दोन कॅमेरे हे ENPR (वाहन नंबर ओळखु शकणारे) आहेत. सदर CCTV कैमेऱ्याचे उद्घाटन संजय दराडे, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र, नवी मुंबई यांचे हस्ते करण्यात आले असून ते कार्यान्वीत करण्यात आले आहेत. सदर कॅमेऱ्यांमुळे बोईसर पोलीस ठाणे हद्दितील सर्व मुख्य नाके व परिसर CCTV कैमेऱ्याचे निगराणीखाली आलेले आहेत. नमूद वेळी विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी टिमा असोशिएशनचे आभार मानून त्यांचे हस्ते असोशिएशनचे अध्यक्ष वेलजी भाई गोगरी, यांचा सत्कार करण्यात आला. सदर CCTV बसवण्यासाठी असोशिएशचे सदस्य गुप्ता, सावे, राणे आणि त्यांचे मार्गदर्शक डि. के. राऊत यांनी मोलाचे सहकार्य केले.सदर कार्यक्रम हा संजय दराडे, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र, नवी मुंबई, बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, विनायक नरळे, अपर पोलीस अधीक्षक, पालघर तसेच जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व अंमलदार, गुन्ह्यातील फिर्यादी, पत्रकार बांधव, टिमा असोशिएशनचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडला.












