पालघर पोलीस दलाकडून पोलीस पाटील यांच्याकरीता सायबर प्रशिक्षणकार्यक्रमाचे आयोजन…!

उपसंपादक : मंगेश उईके
पालघर.सध्याच्या डिजीटल युगात प्रत्येक व्यक्ती मोबाईल फोन, इंटरनेटचा वापर करत आहे. सायबर गुन्हेगार नागरीकांना वेगवेगळे आमिष दाखवणारे फोन कॉल करत असतात. काही नागरीक सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकत आहेत. त्यामुळे सायबर गुन्हयाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. पालघर जिल्हयातील नागरीक सायबर गुन्हंयाना बळी पडु नये तसेच त्यांचेमध्ये सायबर साक्षरता निर्माण करण्यासाठी मा. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर यांच्या संकल्पनेतुन ‘सायबर सुरक्षीत पालघर’ ही मोहिम राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने आज दिनांक-०४/०२/२०२५ रोजी १२.०० वाजता, नियोजन हॉल जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर येथे श्री. विनायक नरळे अपर पोलीस अधीक्षक, पालघर यांचे अध्यक्षतेखाली सायबर सुरक्षित पालघर अंतर्गत सायबर योद्धाना प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी २०० पोलीस पाटील उपस्थीत होते. सदर कार्यक्रमात महिला पोलीस पाटील यांची संख्या उल्लेखनीय होती. सदर वेळी सायबर योद्धा यांना आवश्यक विषय सायबर गुन्हयांची ओळख, सायबर गुन्हे होण्याची पद्धती, सायबर गुन्हे घडल्यानंतर (गोल्डन अवर) पहिल्या एक तासात करावयाची कामगिरी, नॅशनल सायबर क्राईम पोर्टलवर तक्रारी कशी नोंदवावी, मोबाईल हरविल्यानंतर सी.ई.आय.आर. पोर्टल कशी नोंदवावी, याबाबत माहीती देवून, सायबर सुरक्षित पालघर ही व्हिडीओ क्लीप दाखविण्यात आली तसेच सायबर गुन्हे घडल्यानंतर जनतेला कशी मदत करण्यात यावी याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.सदर कार्यक्रम हा मा. श्री. मा. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, श्री विनायक नरळे अपर पोलीस अधीक्षक, पालघर, पोलीस उपअधीक्षक (गृह) श्रीमती संगिता शिंदे अल्फांन्सो यांच्या मार्गदर्शनाखाली परि. पोलीस उपअधीक्षक, श्रीमती भागीरथी पवार, पोलीस निरीक्षक श्री अजय गोरड प्रभारी अधिकारी सायबर पोलीस ठाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजुषा शिरसाट, आर्थिक गुन्हे शाखा, पोलीस उप निरीक्षक, रुपाली गुंड, सायबर पोलीस ठाणे, पोलीस उपनिरीक्षक मंगेश मुंडे, जिवीशा, पोलीस उपनिरीक्षक पुनम सुयवंशी, आर्थिक गुन्हे शाखा, मपोना/कविता पाटील, मपोशि मोनिका तिडके, पोअं/अक्षय शेट्ये, पोअं/रुपेश पाटील, पोअं/रोहित तोरस्कर व इतर अंमलदार यांनी यशस्विरित्या पार पडला.


