पालघर पोलीस दलाकडून जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन संपन्न…

0
Spread the love

उपसंपादक : मंगेश उईके

पालघर ;

जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन दरवर्षी २६ जुन रोजी साजरा केला जातो. श्री. यतिश देशमुख, पोलीस अधीक्षक, पालघर यांनी २६ जून २०२५ रोजी पालघर जिल्ह्यात जागतीक अमंली पदार्थ विरोधी दिनाचे औचित्य साधुन प्रत्येक पोलीस ठाणे हद्दित विविध कार्यक्रमाचे आयोजन करून जनजागृती करण्याबाबत मार्गदर्शन केले.

पालघर पोलीस दलातर्फे जिल्ह्यात सर्व पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त अंमली पदार्थांच्या सेवनाने होणारे दुष्परिणाम याबाबत विविध शाळा, महाविद्यालये, व्यसन मुक्ती केंद्रे व इतर सार्वजनिक ठिकाणी जनजागृती मोहिम राबविण्यात आली तसेच रॅलीचे आयोजन करण्यात आले व शाळेमध्ये निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. सर्व पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात अंमली पदार्थांचे दुष्परिणाम याबाबत औद्योगिक परीसर, रेल्वे स्टेशन, बस स्टॅण्ड, झोपडपट्टी, मोहल्ला या परीसरात बॅनर होडींग लावून जनजागृती करण्यात आली. तसेच अंमली पदार्थाच्या दुष्परिणामाबाबत विविध सामाजिक संस्था, शिक्षण संस्था, सहकारी संस्था यांचे मदतीने जनजागृती अभियान राबविण्यात आले आहेत.

सदर कार्यक्रम हा श्री. यतिश देशमुख, पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. विनायक नरळे, अपर पोलीस अधीक्षक, पालघर यांचे मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी तसेच स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांनी राबविला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट