पालघर पोलीस दलाकडून अनैतिक मानवी व्यापार करणाऱ्या आरोपींवर कारवाई करुन दोन पिडीत महिलांची सुटका..!

उपसंपादक : मंगेश उईके
पालघर.

पोलीस अधीक्षक पालघर श्री. यतिश देशमुख यांनी पालघर जिल्हयातील अवैद्य धंदयाचे समूळ उच्चाटन करणे बाबत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांना सक्त सुचना दिलेल्या आहेत.
त्यानुसार दि. १४/०७/२०२५ रोजी पोलीस निरीक्षक श्री. प्रदिप पाटील, स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांचे मार्गदर्शनाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा, पालघर कडील पोलीस अधिकारी व अमंलदार यांचे पथकाने गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळवुन सापळा रचुन दि.१४/०७/२०२५ रोजी १५.४० वा. चे सुमारास सन अॅण्ड सॅन्ड रिसॉर्ट, रावळेपाडा, वडराई, ता. जि. पालघर येथे डमी गि-हाईक यांना आरोपीत क्रमांक १) सौ. पल्लवी सुनिल अहिरे, वय ४७ वर्षे, रा. प्लॅट नंबर ७०८ हंसराज टॉवर, चाफेकर कॉलेज रोड टेंभोडे, ता.जि. पालघर, २) अजय हरिश्चंद्र इंदुलकर, वय ५९ वर्षे, (रिसोर्ट चालक) रा. रावलेपाडा वडराई ता.जि. पालघर यांनी ०२ पिडीत महीलांना वेश्या व्यावसायाकरीता मिळवुन त्यांना वेश्यागमनाकरीता प्रवृत्त करून पुरुष ग्राहकांस पुरवून त्यातून मिळणारी कमाई स्वतःचे उपजिवीकेसाठी वापरली म्हणून त्यांचेविरुध्द सातपाटी सागरी पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ३९/२०२५ भारतीय न्याय संहिता अधिनियमय २०२३ चे कलम १४४ (२) सह अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५६ चे कलम ३, ४, व ५ प्रमाणे दि. १४/०७/२०२५ रोजी गुन्हा दाखल करुन आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुन्हयाचा पुढील तपास सपोनि/अनिल व्हटकर, नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा, पालघर हे करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, पालघर श्री. यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक, पालघर श्री. विनायक नरळे यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री. प्रदिप पाटील, सहा. पो. निरीक्षक श्री. अनिल व्हटकर, पोउनि/नरेंद्र सावंतदेसाई, पोउनि / रविंद्र वानखेडे, पोउनि/गोरखनाथ राठोड, पोहवा/दिपक राऊत, पोहवा/नरेंद्र पाटील, पोहवा/संदिप सरदार, पोहवा/भगवान आव्हाड, पोहवा/कपिल नेमाडे, पोहवा/कैलास पाटील, पोहवा/दिनेश गायकवाड, पोअमं/विशाल लोहार, पोअमं/बजरंग अमनवाड, पोअमं/नरेश घाटाळ, पोअमं/विशाल नांगरे, म.पोना/मनाली शितप, म. पोअमं/ सपना गडग, सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांनी उत्कृष्टरित्या पार पाडलेली आहे.