पालघर पोलीस दलाकडून अवैधरित्या तंबाखूजन्य पदार्थाची वाहतुक करणाऱ्या आरोपींवर कारवाई करून एकूण १,७८,६५,२४८/- रूपये किंमतीचा मुद्देमाल केला जप्त..!

0
Spread the love

उपसंपादक : मंगेश उईके

पालघर – तलासरी

दिनांक २५/०७/२०२५ रोजी श्री. यतिश देशमुख, पोलीस अधीक्षक, पालघर यांना गोपनीय माहिती मिळाली की, दोन कर्नाटक पासिंगच्या कंटेनर गाड्यामधून महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला पानमसाला व गुटखा भरून त्याची बेकायदेशीररित्या मुंबई-अहमदाबाद महामार्गाने मुंबई बाजूकडे जाणार असल्याची माहिती मिळाल्याने पोनि/अजय गोरड, तलासरी पोलीस ठाणे व पोनि/प्रदिप पाटील, स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांना याबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले.

त्यानुसार तलासरी पोलीस ठाणेचे व स्थानिक गुन्हे शाखेचे दोन पोलीस पथक तयार करून मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मौजे तलासरी विकासपाडा येथे दिनांक २५/०७/२०२५ रोजी दुपारी १३.१५ वाजताचे सुमारास गुजरात बाजूकडून ट्रक क्र. KA-56-9490 व KA-39-A-3012 येत असताना त्यांना थांबवून ट्रक चालकांना त्यांचे नाव, गाव विचारले असता १) इप्तेकार हबीब शेख, वय ४२ वर्षे, रा. कुर्ला, मुंबई (पश्चिम) २) अक्षय नंदकुमार सातपुते, वय २९ वर्षे, रा. मु.पो. रेड सिध्दार्थनगर, हरीजनवाडा समाज मंदिराजवळ, ता. बत्तीस शिराळे, जि. सांगली असे सांगितले. त्यांना ट्रकमधील मालाबाबत विचारपुस केली असता उडवाउडवीची उत्तरे देत होते. त्यामुळे नमूद दोन्ही ट्रकमध्ये चेक केले असता भाताचे तुस भरलेल्या गोण्याखाली महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेला एकूण १,२८,६५,२४८/- रूपये किंमतीचा सुपारी/तंबाखुमिश्रीत गुटखा पदार्थ मिळून आला. त्यामुळे दोन्ही ट्रकसह एकूण १,७८,६५,२४८/- (एक कोटी अट्टेहत्तर लाख पासष्ट हजार दोनशे अड्डेचाळीस रूपये) किंमतीचा मुद्देमाल जप्त करून नमूद आरोपींविरुध्द तलासरी पोलीस ठाणे येथे । १३८/२०२५ भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम १२३, २२३, २७४, २७५ सह अन्न सुरक्षा मानदे कायदा २००६ नियम व नियमने २०११ कलम २३ (२), २७, २३, २६ (२) (४), ३० (२) (ए) सह मा. अन्न सुरक्षा आयुक्त महाराष्ट्र राज्य अधिसुचना शुक्रवार जुलै १२,२०२४ आषाढ २१ शके १९४६ दि.१२/०७/२०२४ रेग्युलेशन २०,२,३,४ ऑफ फुड सेप्टी अॅन्ड स्टेंडड २०११, ३,१,७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नमूद दोन्ही आरोपीस अटक केले असून गुन्ह्याचा पुढिल तपास हा पोउपनि/दरगुडे, नेमणुक तलासरी पोलीस ठाणे हे करीत आहेत.

सदरची कारवाई ही श्री. यतिश देशमुख, पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. विनायक नरळे, अपर पोलीस अधीक्षक, पालघर, श्रीमती अंकिता कणसे, उपविभागीय पोलीस अधिकारी, डहाणु विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. प्रदिप पाटील, स्थानिक गुन्हे शाखा, पालघर, पोलीस निरीक्षक श्री. अजय गोरड, तलासरी पोलीस ठाणे, पोउपनि/दरगुडे श्रेपोउपनि/एन. के. पाटील, सफौ/हिरामण खोटरे, पोहवा/०६ धोडी, पोहवा/पी. पाटील, पोहवा/संदिप नांगरे, पोहवा/पी. के. चौरे, पोना/सचिन आव्हाड, पोअं/वरखंडे, पोअं/घाटाळ, पोअं/के. एन. राबड, पोअं/एन. जी. गांगोडा, पोअं/के. डी. गांगोडा सर्व नेमणुक तलासरी पोलीस ठाणे तसेच पोअं/नरेश घाटाळ, पोअं/बजरंग अमनवाड, नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांनी केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट