पुणे शहर येथून वाहन चोरी करून पळून जाणाऱ्या दोन आरोपीस पालघर पोलीसांनी केले जेरबंद

उपसंपादक – रणजित मस्के
पालघर :- दिनांक १३/०७/२०२३ रोजी सायंकाळी विजय मुतडक, पोलीस निरीक्षक, तलासरी पोलीस ठाणे यांना व्हॉट्सअॅपद्वारे विमाननगर पोलीस ठाणे, पुणे शहर पोलीसांकडुन माहीती मिळाली की, विमाननगर पोलीस ठाणे गुन्हा रजि नं ३०९ / २०२३ मधील चोरीस गेलेली मोटार महींद्रा थार कार अंदाजे किंमत २०,००,०००/- रूपये हि तलासरी पोलीस ठाणे दिशेने येत आहे. त्यावरुन विजय मुतडक, पोलीस निरीक्षक, तलासरी पोलीस ठाणे यांनी श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर यांना माहीती दिली व त्यांचे आदेशांप्रमाणे तात्काळ पथक स्थापन करुन तलासरी पोलीस ठाणे अंतर्गत आर.टी.ओ नाका दापचरी, तलासरी नाका, आच्छाड बॉर्डर चेक पोस्ट, उधवा बॉर्डर दुरक्षेत्र, नारायणठाणे कोस्टल चेक पोस्ट येथे वेगवेगळ्या ठिकाणी नाकाबंदीचे आयोजन केले. दिनांक १४/०७/२०२३ रोजी सकाळी ०८.३० वा. चे सुमारास गुन्हयाचे फिर्यादी नामे बैजनाथ खरमाटे, रा. पुणे यांचेकडुन माहीती प्राप्त झाली की, सदर गुन्हयातील थार कार ही मुंबईकडून गुजरातच्या दिशेने जात असल्याची माहिती प्राप्त झाल्याने नाकाबंदीकरीता नेमण्यात आलेल्या अधिकारी व अंमलदार यांना सतर्क केले. त्यानंतर ९.३० वा. चे सुमारास नमुद वर्णनाची थार कार ही दापचरी आर.टी.ओ नाका येथे प्रचंड वेगाने येत असतांना नाकाबंदीकरीता नेमलेले पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सदर गाडीचा पाठलाग करुन शर्थ करुन ती शितापीने थांबविली. सदर गाडीतील इसम नामे १) शैलेश भिकुभाई हिंगु, वय ३२ वर्षे, रा. नंदनवन सोसायटी पुना गाम, सुरत, २) मिलन विजयभाई जेठवाल, वय २३ वर्षे, रा. चामुंडा नगर, सुरत यांना सदर गाडीसह ताब्यात घेतलेले आहे. नमुद प्रकरणी विमाननगर पोलीस ठाणे, पुणे शहर याठिकाणी गुन्हा दाखल असुन तलासरी पोलीस ठाणे हे पुढील कायदेशीर कारवाई करीत आहेत.

सदरची कामगिरी श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधिक्षक, पालघर, श्री. पंकज शिरसाठ, अपर पोलीस अधिक्षक, पालघर, श्री. संजीव पिंपळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, डहाणु विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, विजय मुतडक, तलासरी पोलीस ठाणे, सहा. फौज/ रामभाऊ साळंबा पवार, २) पोहवा / प्रमोद विश्वासराव पाटील, ३) पोना / सदु काशिराम भेस्कर, ४) पोशि/ यशवंत गुलाबराव पाटील श्री. सुरेश शिंगडा, पोहवा / प्रसन्ना पाटील, पोशि/ महेश जाधव यांनी केली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com