पालघर मध्ये महिला दिन व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथी अभिवादन कार्यक्रम संपन्न..!

0
Spread the love

उपसंपादक-मंगेश उईके

पालघर ;

सहकार भारती पालघर
महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना पालघर – जिल्हा
सी.बी. कोरा केंद्र बोरिवली
यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथी अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला.

दि. 10/03/2025 रोजी सहकार भारती ,पालघर- जिल्हा , आणि महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या निमित्ताने खादी ग्रामउद्योग संस्था चे वक्ता मा.श्री. अजय बारी * यांच्या मार्फत
स्वयंरोजगार तसेच , सरकारी योजना, कर्ज वाटप, प्रशिक्षण, बनविलेल्या मालाला मार्केट आणि कसे मिळवायचे ही सर्व माहिती देण्यात आली.त्याचप्रमाणे *महिला सुरक्षा, सायबर क्राईम च्या बद्दल महिला सेल इन्चार्ज एसपी ऑफिस पालघर मा.सौ. सविता सुळे मॅडम यांनी मार्गदर्शन दिले . तसेच महिलांचा सहकार सहभाग यावर सहकार भारती पालघर अध्यक्ष मा. सौ. पूर्वा सावंत यांनी या विषयांवर मार्गदर्शन दिले , तसेच सहकार भारती महामंत्री मा. श्री. नितीन वझे यांनी, क्रांतीज्योती सावित्रीआई फुले तसेच पुण्यश्लोक ,राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यशैलीबद्दल माहिती दिली, सहकार भारती बद्दल माहिती दिली, सहकारी संस्थाचें सहकार क्षेत्रातील योगदानाबद्दल मनोगत व्यक्त केले व तनिष्क ज्वेलर्स बोईसर यांनी महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा देत तनिष्क ज्वेलरी ची माहिती दिली. या कार्यक्रम मध्ये सर्वांचे सत्कार करत महिलाना महिला दिनाच्या शुभेच्छा देत.हा कार्यक्रम संपन्न करण्यात आला.

या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून.
सौ. पूर्वा सावंत
अध्यक्षा, सहकार भारती
पालघर- जिल्हा (प)
श्री. नितीन वझे
महामंत्री, सहकार भारती पालघर
सौ.हर्षु ताई तरे
महिला प्रमुख सहकार भारती
सौ.सुवर्णा वाघमारे*
महिला सह प्रमुख व
महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना
पालघर जिल्हा उपाध्यक्ष
मा.श्री. मंगेश उईके
महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना जिल्हा महासचिव
अनेक मान्यवर उपस्थित होते.
तसेच इतर बचत गट व विविध क्षेत्रातील ६५ महिला प्रतिनिधींची उपस्थिती होती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट