पालघर मध्ये पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ मुस्लिम समाजाकडून निषेध आंदोलन

उपसंपादक-मंगेश उईके




दि. २५,पालघर: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी (ता. २५) पालघर शहर समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने शहरातील जामा मशिदेच्या बाहेर दुपारी २ वाजता शुक्रवार ची नमाज पठण केल्यानंतर निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी असंख्य मुस्लिम बांधव उपस्थित होते.
पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यानंतर सम्पूर्ण देशात संतापाची लाट आली आहे. ठिकठिकाणी निषेध केला जात आहे. त्याअनुषंगाने पालघर मध्ये ही समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने या हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. यावेळी मुस्लिम समाजातील बांधवांनी हातावर काळे फीत बांधून पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या पर्यटकांप्रति श्रद्धांजली अर्पण करत आपलं दुःख व्यक्त केला. या दरम्यान ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ व ‘पाकिस्तान वर कारवाई करा व गुन्हेगारांना शिक्षा द्या” इत्यादी घोषणा ही देण्यात आली तसेच पाकिस्तान देशाचा राष्ट्रध्वज फाडून पेटवण्यात आला. यावेळी दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करण्याची मागणी करण्यात ही उपस्थित आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली.