पालघर मध्ये मोकाट जनावरांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडी व संभाव्य अपघाताबाबत वृषभ मंगेश वारे यांची पालघर शासकीय कार्यालयात तक्रार..!

उपसंपादक : मंगेश उईके
पालघर :-वृषभ मंगेश वारे, युवा उपशहर अध्यक्ष शिवसेना व अध्यक्ष- रॉयल शैक्षणिक व सामाजिक संस्था, आंबेडकर नगर, पालघर (पूर्व) येथे वास्तव्यास असून, आपल्या कार्यालयाच्या माध्यमातून एक अत्यंत गंभीर आणि नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित बाब निदर्शनास आणून देत आहे.





पालघर शहरातील सुंदरम नाका, माहिम रोड व जुना सातपाटी रोड तसेच इतर विभागातील प्रमुख रस्त्यांवर दररोज मोकाट जनावरांचा अनियंत्रित संचार होत असून त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होते. परिणामी, नागरिकांना अपार त्रास सहन करावा लागत असून रुग्णवाहिका, अग्निशमन दल व इतर अत्यावश्यक सेवा यांनाही मोठा अडथळा निर्माण होतो आहे. याशिवाय, रस्त्यावर फिरणाऱ्या मोकाट जनावरांमुळे अपघात घडण्याची शक्यता दिवसेंदिवस वाढत चालली असून, मनुष्यहानी व प्राणीहानीचा धोका निर्माण झाला आहे.
तरी, आपण संबंधित यंत्रणांना आवश्यक त्या सूचना देऊन जनावरांचे मालक शोधून त्यांना सक्त ताकीद द्यावी अशी खालीलप्रमाणे तातडीने कारवाई करावी, अशी अर्ज निवेदन
पालघर जिल्हाधिकारी कार्यालय
पालघर पोलीस अधीक्षक कार्यालय
पालघर नगर परिषद कार्यालय
पालघर पशु संवर्धन कार्यालय येथे देण्यात आले.अशी माहिती शिवसेना ( शिंदे गट ) युवा अध्यक्ष व रॉयल शैक्षणिक सामाजिक संस्था अध्यक्ष वृषभ वारे यांनी दली.