पालघर, कोकण क्षेत्रातील पोलीस दलातील अधिकारी यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहिर…!

उपसंपादक : मंगेश उईके
पालघर.
पोलीस सेवेत उल्लेखनीय कामगिरी आणि गुणवत्तापूर्वक सेवा करणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांना केंद्र शासनाकडून दरवर्षी प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती पोलीस पदक दिले जाते. राष्ट्रपती पोलीस पदक हे कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना दिला जाणारा सन्मान आहे. सदरचे राष्ट्रपती पोलीस पदक हे ०१ मार्च १९५१ रोजी पासून दिले जाते.
महाराष्ट्र राज्यातील एकूण ३९ पोलीस अधिकारी व अंमलदार यांना त्यांच्या गुणवत्तापुर्वक सेवेकरीता व ४ पोलीस अधिकारी यांना त्यांच्या उल्लेखणीय कामगिरी बद्दल राष्ट्रपती पोलीस पदक जाहिर झालेले आहे. कोकण परिशेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. संजय भास्कर दराडे तसेच पालघर पोलीस दलातील श्री. अनिल लक्ष्मण लाड, पोलीस उप अधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, पालघर अतिरिक्त कार्यभार उपविभागीय पोलीस अधिकारी, डहाणु विभाग श्री. रविंद्र बाबुराव वानखेडे, पोलीस उप निरीक्षक, नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा पालघर यांना गुणवत्तापूर्वक सेवेकरीता राष्ट्रपती पोलीस पदक जाहिर झालेले आहे.


त्याबद्दल श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. विनायक नरळे, अपर पोलीस अधीक्षक, पालघर, श्रीमती संगीता शिंदे अल्फोन्सो, पोलीस उप अधीक्षक (गृह), पालघर, श्री. विकास नाईक, उपविभागीय पोलीस अधिकारी, बोईसर विभाग, श्री. अभिजीत धाराशिवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, पालघर विभाग, श्री. गणपतराव पिंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, जव्हार विभाग तसेच जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी अभिनंदन केले आहे.