पालघर जिल्हा पोलीस दलात Measurement Collecetion Unit (MCU) चा शुभारंभ.

0
Spread the love

उपसंपादक : मंगेश उईके

पालघर.
दि. २४/०६/२०२५ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय पालघर येथे मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र, श्री. संजय दराडे यांचे शुभहस्ते Measurement Collecetion Unit (MCU) चे उदघाटन करण्यात आलेले आहे. सदर उदघाटन कार्यक्रमास पोलीस अधीक्षक, पालघर श्री. यतिश देशमुख, पोलीस उप अधीक्षक (गृह), श्रीमती संगिता शिंदे अल्फोन्सो, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, पालघर, श्री. प्रदिप पाटील तसेच पोलीस अधिकारी व अमंलदार हजर होते.

Criminal Procedure (Identification) Act 2022 या कायदयाअंतर्गत NCRB नवी दिल्ली यांचे मार्गदर्शनाप्रमाणे सर्व जिल्हा स्तरावर Measurement Collecetion Unit (MCU) स्थापित करण्याचे निर्देश दिलेले आहेत. सदर प्रणालीद्वारे भारतातील राज्यांमधील सर्व जिल्हे, सर्व कारागृह प्रशासन एकमेकांना जोडण्यात आलेली आहेत. Measurement Collecetion Unit मध्ये गुन्हेगारी प्रकरणांमध्ये सहभागी असलेल्या अटक आरोपींचे भौतिक आणि जैविक माहिती (डेटा) चे संकलन, साठवणूक आणि विश्लेषण करण्यास अधिकृत करण्यात आलेले आहे.

Identification Of Prisioners Act 1920 या जुन्या कायदया अंतर्गत न्यायालयाने एक वर्षे किंवा त्याहून अधिक शिक्षा ठोठावलेले दोषी तसेच अंतर्गत चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या आणि नंतर सोडुन दिलेल्या व्यक्तींच्या हातापायाचे ठसे आणि फोटो जमा करण्यात येत होते. त्यात आधुनिकीकरण करुन, Criminal Procedure (Identification) Act 2022 वा कायदयाचा नुसार स्थापित करण्यात आलेल्या MCU मध्ये जिल्हयातील अटक आरोपींचे रेटीना, हातापायांचे ठसे, शरीराचे मोजमाप, शरीरावरील ओळखीच्या खुणा/व्रण, सर्व अँगल मधील फोटो व त्याची वैयक्तीक माहिती संकलीत करुन, ती माहिती गुन्हे तपासीक अधिकारी/अमंलदार यांना त्यांच्या ई मेल आयडीवर तात्काळ पाठविली जाईल. तसेच सदरची माहिती सुमारे ७५ वर्षे संकलीत राहणार असल्याने, त्यामुळे प्रथम गुन्हा करणारे आरोपीने त्याचा पोषाख अथवा चेहरा यांचे वेषांतर करुन दुसरा गुन्हा केल्यास, त्या गुन्हयातील तांत्रीक/फोटो/व्हिडीओ यावरुन MCU द्वारे नमुद गुन्हेगारांची तात्काळ ओळख पटविण्यास मदत होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट