पालघर जिल्ह्यात. प. पु.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वि.जयंती मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरी…

0
Spread the love

प्रतिनिधी-मंगेश उईके

पालघर :– महामानव विश्वरत्न प.पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ वा जयंती महोत्सव मोठ्या उत्साहाने व जल्लोषाने संपूर्ण देशभरात साजरी करण्यात येतो. तसेच पालघर शहरात साजरा करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर पालघर( पूर्व ) ग्रामस्थांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही भीम जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरी केला. आंबेडकर नगर पालघर पु. जयंती महोत्सव कमिटी अध्यक्ष. आनंद राऊत व त्यांचे कमिटी पद अधिकारी व सदस्य तसेच ग्रामस्थांनी १२/०४/२०२४ ते १४/०४/२०२४ म्हणजेच ३ दिवस लगातार कार्यक्रमा चे नियोजन व आयोजन करण्यात आले. सुरुवातीला बुद्ध वंदना घेत.कॅरम स्पर्धा. बुद्धिबळ स्पर्धा. रांगोळी स्पर्धा. चित्रकला स्पर्धा. तसेच शिवा भीमा आर्केस्ट्रा. पुरुष व्हॉलीबॉल स्पर्धा. पुरुष व महिला क्रिकेट सामने. धावणी स्पर्धा. महिलांचे स्नेहसंमेलन व विविध सांस्कृतिक कार्यक्रम नृत्य.गायन व ३. दिवस स्नेह भोजनाचे, तसेच भिम मिरवणुकीच्या वेळेस सायंकाळी गांधीनगर येथे वडापाव (नास्ता )चे आयोजन जगदीश राऊत यांनी केले.

तसेच १४/०४/२०२४ रोजी सायंकाळी सुमारे ०५.०० वाजता डॉ. आंबेडकर नगर पालघर पूर्व येथून महामानव विश्वरत्न प.पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी दिलेल्या स्वातंत्र्य समता, बंधुभाव, न्याय, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, आणि मतदानाचा दिलेला मूलभूत अधिकार हे भारत देशाच्या नकाशावर हे अगदी सुबकपणे रेखाटून तसेच भारताला दिलेले संविधान आणि संविधानावर चाललेले भारतदेश असे भव्य दिव्य देखाव्या च्या माध्यमातून जनतेला एक चांगला संदेश जाईल असा देखावा साकारण्यात आला होता. लेझीम व डीजे.ढोल ताशा च्या तालावर पारंपरिक नृत्य करीत निळे झेंडे, निळे फेटे,पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून लहान मुलांपासून ते वयोवृद्ध देखील या भव्य शोभायात्रा ला सामील झाले होते. डॉ.आंबेडकर नगर पालघर पूर्व ते पालघर स्टेशन होऊन आंबेडकर चौक टेंभोडे येथे शोभायात्रा नेण्यात आले होते .

सोबत पालघर शहरातील भिमाई नगर नवली तसेच आंबेडकर नगर टेंभोडे यांचेही डॉ. बाबासाहेब आंबेडकर भव्य दिव्य आकर्षित प्रतिमा देखाव्यासह डीजेच्या तालावर नाचत गाजत शोभायात्रा पालघर शहराच्या मध्यवर्ती पाच बत्ती या ठिकाणी एकत्रित येऊन जल्लोष एकोपाने करण्यात आला. सोबत पालघर पोलिसांनी सहकार्य केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मिरवणुकीला हजारोच्या संख्याने भीम अनुयायी सामील होऊन भिम जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाणे व जल्लोषाने आनंदात साजरी करण्यात आला.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट