पालघर जिल्हास्तरीय स्वच्छता रन चे आयोजन करून स्वच्छता हि सेवा मोहिमेचा समारोप…

0
Spread the love

उपसंपादक : मंगेश उईके

पालघर :- स्वच्छता हि सेवा 2024 अभियान अंतर्गत नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत वर्तणुक बदल घडविण्यासाठी विविध उपक्रम घेण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून पालघर तालुक्यात ग्रामपंचायत सरावली येथे स्वच्छता रनचे आयोजन करून आज या उपक्रमाचा समारोप करण्यात आला. जिल्हास्तरीय स्वच्छता रन 2024 मध्ये जिल्हाधिकारी, गोविंद बोडके,मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर जगताप, महिला व बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण भावसार, पाणी व स्वच्छता विभागाचे प्रकल्प संचालक धनराज पांडे, पालघर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी नरेंद्र रेवंडकर व ग्रामपंचायतीचे सरपंच , उपसपंच,ग्रामसेवक, जिल्हा पाणी व कक्षातील सल्लागार, तालुका समन्वय, ग्रामपंचायतमधील नागरिक व शिक्षक व शालेय विद्यार्थी यांनी सहभाग घेवून स्वच्छतेचा संदेश दिला.



स्वच्छ भारत मिशन अंतर्गत महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून दि. 2 ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस (SBD) म्हणून साजरा केला जातो. त्यास अनुसरुन दरवर्षी प्रमाणे स्वच्छता ही सेवा (SHS) मोहिम दि. 17 सप्टेंबर 2024 ते दि. 2 ऑक्टोबर 2024 या कालावधीत गाव स्तरावर ग्रामपंचायती अंतर्गत स्वच्छतेची जनजागरण करण्याकरिता विविध उपक्रम राबविण्यात आले.

या वर्षीच्या स्वच्छता ही सेवा 2024 साठी “स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता” ही थीम निश्चित केली होती .

त्याचप्रमाणे आज दि. 02 ऑक्टोबर 2024 रोजी स्वच्छता हि सेवा 2024 अभियान अंतर्गत पालघर तालुक्यात ग्रामपंचायत सरावली येथे स्वच्छता रन 2024 व उमरोळी येथे तालुकास्तरीय प्लास्टिक व्यवस्थापन प्रकल्पाचे उद्धाटन केले. तसेच आठही तालुक्यात स्वच्छतेचे विविध उपक्रम घेण्यात आले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट