पलावा सिटीत एम.डी. पावडर हा अंमली पदार्थ विक्री करणारे दोन सराईत इसमांना मानपाडा पोलीस स्टेशन पोलीसांकडून अटक…

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

डोंबिवली :– मानपाडा पोलीस ठाणे हददीत लोढा पलावा, फेज-२, खोणी भागात दोन इसम हे एम.डी. हा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी आले असल्याची माहीती गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि/सुनिल तारमळे यांना मिळाल्याने, त्यांनी सदरची माहीती लागलीच वपोनि/श्री अशोक होनमाने यांना कळविली असता, वपोनि/श्री.होनमाने यांनी श्री. राम बोपडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), सपोनि/तारमळे व पथकास कारवाई करणेबाबत आदेशित केले. अंमली पदार्थ विको करणारे आरोपीत इसम हे पलावा सिटी, गेट नं. २ जवळ आले असल्याने लागलीच सपोनि सुनिल तारमळे व टिम यांनी तात्काळ सदर ठिकाणी जावुन, पलावा सिटी मॅनेजमेंट असोशियन स्टाफ यांचे मदतीने १) आर्शद करार खान वय-२८ वर्षे, रा. एफ १४०६, फाउंटना, पलावा, फेज २. खोणी, डोबिवली पूर्व २) शादाबुदीन मोईनुद्दीन सय्यद वय-२८ वर्षे रा. शोर प्रान, लंगरखाना, वार्ड नं ३२, खादीम मोहल्ला, अजमेर, राजस्थान यांना ताब्यात घेवून, त्यांचेकडुन एकुण २,३२,०००/-रू किमतीची ५८ ग्रम वजनाची सफेद रंगाची क्रिस्टल एम.डी. पावडर (Methadone) हा अंमली पदार्थ तसेच १) होंडा सिबीआर मोटार सायकल २) दोन मोबाईल फोन ३) २,२३,४०४/- रू रोख रक्कम असा एकुण ५,३०,४४०/-रू किमंतीचा मुद्देमाल कायदेशिर तरतुदीचे पालन करून हस्तगत करण्यात आलेला आहे.

आरोपीत आर्शद करार खान हा अंमली पदार्थ जवळ बाळगुन विकी करण्यास सराईत गुन्हेगार असून,
त्याच्यावर यापुर्वी दाखल गुन्हे – मुंब्रा पोलीस स्टेशन येथे १२२४/२०२१ एन.डी.पी.एस. कलम ८ (क), २२ (ब), २२ (क), २९
२ ए.पी.एम.सी. पो. ठाणे नवी मुंबई
२७४/२०२३ एन.डी.पी.एस. कलम ८ (क), २२ (ब), २२ (क), २९

एकुण १५१ ग्रॅम एम.डी. पावडर यातील आरोपीताकडुन जप्त करण्यात आलेला अंमली पदार्थ कोठे तयार केला आहे? कोणास विकी केला आहे का? कोणास विकी करणार होते? तसेच त्यांचे आणखी कोणी साथीदार आहेत काय?याबाबतचा सखोल तपास मानपाडा पोलीस ठाणे कडुन करण्यात येत आहे.

सदरची कामगिरी मा.श्री. दत्तात्रय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग कल्याण, मा. श्री. सचिन गुंजाळ, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३. कल्याण व मा. श्री. सुनिल कुराडे सहाय्यक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि/श्री. अशोक होनमाने यांचे देखरेखी खाली पोनि/श्री. राम चोपडे (गुन्हे), सपोनि सुनिल तारमळे, सपोउपनिरी. भानुदास काटकर, पोहवा/सुनिल पवार, पोहवा./संजु मासाळ, पोहवा./ विकास माळी, पोहवा./ शिरीष पाटील, पोशि. / विजय आव्हाड, पोशि/अशोक आहेर, पोशि/८२४६ ढाकणे यांचे पथकाने केलेली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट