पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून ३६ लाखाची फसवणूक करणारा भोंदू बाबा पंढरीनाथ पवार अखेर सातारा पोलीसांच्या ताब्यात..

उपसंपादक : राकेश देशमुख
महाड :-सातारा शहर पोलीस ठाणे हद्दीतील एका व्यक्तीची आघोरी पुजा, जादू टोणा चमत्कार करुन पैशाचा पाऊस पाडून हवेतून गुप्त धन काढून देण्याचे आमिष दाखवून ३६ लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याची तक्रार २५ जून रोजी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती.
सातारा पोलीसांनी तपासाचे चक्र फिरवीत, सातारा जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल, उपविभागीय पोलिस अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र म्हस्के यांच्या सुचनेनुसार सातारा गुन्हे पथकाने या प्रकरणातील संशयितांना रायगड जिल्ह्यातून ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता पैशांचा पाऊस पाडून हवेतून गुप्त धन काढून देण्याचे आमिष दाखवून ३६ लाख रुपयांची फसवणूक करणारा भोंदू बाबा पंढरीनाथ गणपती पवार ऊर्फ काका महाराज हा रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील असल्याचे समोर आले.
सातारा गुन्हे पथकाने २४ तासांच्या आत आरोपी पंढरीनाथ गणपती पवार ऊर्फ काका महाराज याला अटक केली असून आरोपी पंढरीनाथ उर्फ काका महाराज या भोंदू बाबाची सातारा पोलीसांकडून कसून चौकशी सुरू आहे, या गुन्ह्यातील आरोपींच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता असून या गुन्ह्याचा अधिक तपास सातारा शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.मते हे करीत आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com