इमानदारी ! ‘आम्हाला पगार भरपूर आहे, तु गरीबाचे पैसे परत कर’; लाच देणाऱ्याला पकडून देणारे सहा. पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम

0
Spread the love

पुणे –

उपसंपादक-उमेद सुतार

आम्ही इथे लोकांना न्याय देण्यासाठी आलो आहे. गरीबाचे पैसे लुबाडून ते तो पैसा मला देत होता. मी त्याला वारंवार सांगितले की, मला पैसे नको देऊस. मला भरपूर पगार आहे. तू त्यांचे पैसे परत कर. पण तो त्यांचे पैसे परत न करता मला पैसे देण्याचा प्रयत्न करत होता. शेवटी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली (Pune ACB Trap). त्यांनी सापळा रचून त्याला पकडले, हे सांगत होते सहायक पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम (API Nandkumar Kadam).

कोल्हापूर येथे काँस्टेबल म्हणून काम करत असताना एमपीएससीची परिक्षा देऊन पोलीस उपनिरीक्षक झालेले नंदकुमार कदम हे आज अनेक तरुणाचे आदर्श झाले आहेत. पोलीस खात्यात नव्हे तर सरकारी खात्यात यायचे ते कमविण्यासाठी अशीच दृष्टी अनेकांची असते. पण, त्यामध्येही काही वेगळे असतात. त्यापैकी एक नंदकुमार कदम.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट