सोन्या चांदीच्या व्यापाऱ्यांची फसवणूक करणाऱ्या गुन्हयाचा मुख्य सुत्रधार आरोपी ओरिसा येथुन जेरंबद..

उपसंपादक-रणजित मस्के
सांगली :- पोलीस स्टेशन आटपाडी पोलीस ठाणे
फिर्यादी नाच
गु.र.नं. ३५०/२०२४, बी.एन.एस २०२३ कलम ३१६(४),३१८(४), ३(५) प्रमाणे
प्रसाद भारत जवळे, रा. पंचायत समिती जवळ, आटपाडी.
गु.दा.ता वेळ ता. ३१/०८/२०२४ रोजी
माहिती कशी प्राप्त झाली गोपनीय बातमीदार व तांत्रिक माहिती
दि.२४/०८/२०२४ रोजी सायकांजी १७.०० पर ते दि. २९/०८/२०२४ रोजीचे सायकाळी १७.०० था चे दरम्यान,
कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार मा. संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली.
मा. रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक, सांगली. यांचे मागदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा, सहा. पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन, स्था. गु. अ. शाखा, सहा. पोलीस निरीक्षक रुपाली बोबडे, सायबर पोलीस ठाणे,
पोहेकों / अमोल लोहार, उदयसिंह सांळुखे, सागर टिंगरे, पोना / संदीप नलावडे, पोशि/ सुनिल जाधव, सोमनाथ पतंगे, स्था. गु. अ. शाखा, पोशि / कैप्टन गुंडवाडे, सायचर पोलीस ठाणे.
आरोपीचे नांव पत्ता
१) गौतम गोपाल दास, वय ४३ वर्षे, रा. मुळ गाव गोपालनगर, दक्षिणपाडा, कोलाघाट, जि. पुर्व
मेदीनीपुर, राज्य- पश्चिम बंगाल,
अटक वेळ दिनांक दि. १६/०९/२०२५ रोजी
२) रुमा गौतम दास, वय ३७ वर्षे, रा. मुळ गाव गोपालनगर, दक्षिणपाडा, फोलाघाट, जि. पूर्व मेदीनीपुर, राज्य- पश्चिम बंगाल. गुन्हे
१) आटपाडी पोलीस ठाणे गु.र.नं. ३५०/२०२४, बी.एन.एस २०२३ कलम ३१६(४), ३१८(४), ३(५) प्रमाणे २) सांगली शहर पोलीस ठाणे गु.र.नं. ४३१/२०२४, बी.एन.एस २०२३ कलम ३१६(४), ३१८(४), ३(५) प्रमाणे
गुन्हयाची थोडक्यात हकीकत- आटपाडी व सांगली येथील सोन्या चांदीचे व्यापारी यांनी गौतम दास या कारागिरास वेळोवेळी चोख सोने देवून त्या सोन्याचे दागिने बनविण्याकरीता दिले होते. सदरचे सोने घेवून गौतम दास हा त्याचे साथीदारांसह दि. ३१/०८/२०२४ रोजी पळून जाऊन फसवणूक केल्याबाबत आटपाडी व सांगली शहर पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल आहेत.
सदर गुन्हयाच्या अनुशंगाने मा. पोलीस अधीक्षक, संदीप पुगे चंनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस सदर फसवणूक करणाच्या मुख्य आरोपीचा शोध घेवून त्यास गुन्हयाचे कामी अटक करणेकरीता आदेशीत केले होते.
सदर सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्था. गु. अ. शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन व स्टाफ यांचे पथक तयार करून सदर गुन्हयातील मुख्य आरोपीचा शोध घेणेबाबत आदेशीत केले होते.
सदर आरोपी हा मुळचा पश्चिम बंगाल येथील राहणारा असल्याने सहा पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन हे पथकासह पश्चिम बंगाल येथे तपास कामी गेले. तेथे सदर आरोपी लपण्याच्या वेगवेगळ्या ठिकाणांची माहिती काढून सदर ठिकाणी जावून आरोपीचा शोध घेतला असता आरोपी मिळून आला नाही. आरोपी वारंवार त्याचे वास्तव्याचे ठिकाण बदलत असल्याचे लक्षात आल्याने, त्या अनुशंगाने तपास पथकाने परराज्यात गोपनीय बातमीदार तयार केले. सदर बातमीदार व तांत्रिक तपास यांचे मदतीने सदर आरोपी हा जगन्नाथपुरी, ओरिसा येथे असलेबाबत खात्रिशीर माहिती मिळाल्याने तपास पथकाने जगन्नाथपुरी, ओरिसा येथे जाऊन आरोपीचा शोध घेतला असता, आरोपी नामे गौतम गोपाल दास, वय ४३ वर्षे, रा. मुळ गाव गोपालनगर, दक्षिणपाडा, कोलाघाट, जि. पूर्व मेदीनीपुर, राज्य पश्चिम बंगाल हा मिळून आल्याने त्यास गुन्हयाचे कामी ताब्यात घेतले.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीच्या अटकेबाचत कायदेशीर कारवाई करून मा. एस. डी. जे. एम. पुरी जिल्हा न्यायालय यांचे समक्ष हजर करून गुन्हयाची सर्व गंभीर परिस्थिती चावत सविस्तर माहिती न्यायालयाचे समक्ष मांडुन नमुद आरोपीचे ट्रान्झीट रिमांड मंजुर करून घेतले.
नमुद आरोपीस गुन्हयाचे पुढील तपास कामी व कायदेशीर कारवाई कामी आटपाडी पोलीस ठाणेस रिपोर्टसह हजर करण्यात आले असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास आटपाडी पोलीस ठाणे करीत आहे.
तसेच सांगली शहर पोलीस ठाणेस दाखल गुन्हयातील पाहिजे आरोपी गौतम गोपाल दास याची पत्नी रुमा गौतम दास हि विश्रामबाग सांगली येथे मिळून आल्याने तिला सांगली शहर पोलीस ठाणेस रिपोर्टसह हजर करण्यात आले आहे. या गुन्हयाचा पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाणे करीत आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com