रायगड जिल्ह्यातील गोरेगांव येथे सायबर क्राईम रोखण्यासाठी जनजागृती रॅलीचे आयोजन…

प्रतिनिधी-रणजित मस्के
गोरेगांव: रायगड जिल्ह्यातील गोरेगांव येथे आज दिनांक १९ ऑक्टोबर 2022 रोजी विभागातील सायबर क्राईम रोखण्यासाठी गोरेगांव पोलीस ठाणे हद्दीतील गोरेगांव गावामधील ना.म.जोशी महाविद्यालय येथील शिक्षक व विद्यार्थी यांचे समवेत विभागातील सायबर क्राईम रोखण्याच्या अनुषंगाने विभागात जनजागृती रॅलीचे भव्य दिव्य आयोजन करण्यात आले होते.



रॅली दरम्यान सायबर क्राईम अनुषंगाने महिती देऊन योग्य ती खबरदारी घेणेबाबत आवाहन गोरेगांव पोलीस ठाण्या मार्फत करण्यात आले. यावेळी कोणत्याही व्यक्तीच्या सांगण्यावरून मोबाईल मध्ये लिंक किंवा अप्लीकेशन ओपन करु नका अशा प्रकारचे अनेक संदेश देऊन सायबर क्राईम बाबत जनजागृती करण्यात आली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com