सांगली जिल्हा पोलीस दल व सांगली जिल्हयातील महाविद्यालयांचे प्राचार्य यांचे सोबतचर्चासत्र आयोजन ..

उपसंपादक-रणजित मस्के
सांगली :


दि. २०/१२/२०२४ रोजी मा. पोलीस अधीक्षक, सांगली यांचे कार्यालय येथे सांगली जिल्हयातील सर्व कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य यांचे सोबत चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते. दि.२१/१२/२०२४ रोजी चर्चा सत्रात मा. संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली, मा. रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक, सांगली, मा. दादासाहेब चुडाप्पा, पोलीस उप अधीक्षक (गृह), सांगली तसेच एकुण ८४ महाविद्यालयाचे प्राध्यापक हजर होते. विदयार्थ्यांमधील वाढती व्यसनाधिनता, जनजागृतीचा अभाव, सायबर गुन्हयांमध्ये वाढ, वाहतुक नियमांबद्दल जागृतीचा अभाव या विषयी कोणकोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते किंवा त्यामध्ये काय सुधारणा करता येईल त्या अनुषंगाने चर्चा झाली.
चर्चा सत्रात निर्भया पथक, तक्रारी अवेअरनेस, रॅगिंग, बालकांचे लैंगिक अत्याचारापासुन संरक्षण बस स्टॅन्ड, रेल्वे स्टेशन पेट्रोलिंग, खाजगी क्लासेसचे नियम अटी, अंमली पदार्थांचे सेवन, दुष्परिणाम याबाबत चर्चा करण्यात आली. उपस्थित प्राचार्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. त्यांना येणा- या अडीअडचणी व संबंधित विषय याबाबत आपले विचार मांडले.
मा. संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली यांनी चर्चा सत्रात अंमली पदार्थाचे सेवनामुळे मनुष्य जीवनात, विद्यार्थ्यांवर होणारे दुष्परिणाम, त्यावरील उपाययोजना याबाबत मार्गदर्शन केले. बालकांचे लैंगिक अत्याचारापासुन संरक्षण-२०१२, संगणक, स्मार्ट फोन यातुन होणारे गुन्हे, व्यसनाधीनता, सायबर गुन्हे याबाबत मार्गदर्शन केले.
नमुद सर्व घटकांच्या अनुषंगाने शैक्षणिक संस्थांची जबाबदारी काय आहे? अॅन्टी रॅगिंग कमिटी यांची कर्तव्ये, निर्भया पथकात समन्वय ठेवणे, लैंगिक अत्याचार तक्रारी, विशाखा समितीची कार्ये, कॉफी शॉपवर कारवाई, स्कुल बस मध्ये सी.सी.टी.व्ही. कॅमेरे लावणे, स्कुल बस चालकांचे पोलीस व्हेरिफिकेशन, विद्यार्थ्यांमध्ये वाढती व्यसनाधीनता, अंमली पदार्थाचे सेवन याबाबत काळजी व उपाययोजना, पोलीस प्रशासन व पालक यांची संयुक्त बैठक आयोजन, महाविद्यालय परिसरात विद्यार्थ्यांना ओळख पत्र अनिवार्य करणे, महाविद्यालयाचे कॅम्पस मध्ये अंमली पदार्थाचे पान शॉप, टपऱ्यांना बंदी, तसेच मुलींचे अपहरण, बालविवाह, आत्महत्या या विषयांवर मा. संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली व मा. रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक, सांगली यांनी सूचनापर मार्गदर्शन केले.
तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासुन संरक्षण-२०१२ तसेच ट्राफिक, अंमली पदार्थ सेवन दुष्परिणाम/उपाययोजना बाबत प्रबोधनपर पत्रके वाटप करण्यात आली. मा. रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक, सांगली यांनी आभार प्रदर्शन केले.