साताऱ्यात उंच भरारी योजने मार्फत युवकांना नविन दिशा देण्याचे आयोजन…

उपसंपादक – रणजित मस्के

सातारा : -सातारा जिल्हयातील अशी ठिकाणे जेथे युवकांमध्ये योग्य मार्गदर्शन, संधी व साधनांअभावी किरकोळ स्वरुपाचे गुन्हे दाखल होण्याचे प्रकार होतात अशा क्षेत्रातील युवकांना योग्य मार्गदर्शन व संधी उपलब्ध करून त्यांच्या कल्याणासाठी तसेच विकासासाठी समुपदेशन, मानसोपचार, शिक्षण, कौशल्य विकास, खेळ, रोजगार अशा तरतुदी करणेसाठी उंच भरारी योजने अंतर्गत त्रिसुत्री कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यातील पहीला टप्पा कौशल्य विकास व नोकऱ्या (रोजगार) सुरु असून त्यामध्ये सातारा जिल्हयातील १५ ते २५ या वयोगटातील युवक व त्यांचे पालक यांचेशी संवाद साधुन त्यांना त्यांच्या आवडीनुसार नोकरी किंवा रोजगार उपलब्ध करून येणे, तसेच त्यांना स्वतःच्या व्यवसायाकरीता कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे.


सातारा जिल्हयामध्ये फेब्रुवारी व मार्च २०२३ मध्ये सातारा, सातारा ग्रामिण (कोरेगाव), वाई, कराड, फलटण, पाटण या उपविभागामध्ये उपविभागीय स्तरावर युवकांना बोलावुन त्यांना आयडीबीआय ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (RSETI), मेवावी स्किल युनिव्हर्सिटी, प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन तसेच माणदेशी फाऊंडेशन यांचे कढील कोर्सेसची सविस्तर माहीती देवून व्यवसाय व रोजगार मिळणेबाबत एकूण ५४७ युवक व युवतींना मार्गदर्शन केले आहे.
पोलीस अधीक्षक, श्री. समीर शेख यांचे मार्गदर्शनाखाली आज दिनांक १५/०६/२०२३ रोजी प्रथम एज्युकेशन फाऊंडेशनचे यांचे माध्यमातून दुचाकी रिपेअरिंग/ मॅकेनीकल या कोर्सचे ६० दिवसाचे प्रशिक्षणाकरीता सातारा जिल्ह्यातील २५ युवकांना कोल्हापूर येथे तसेच १६ युवकांना औरंगाबाद या ठिकाणी असे एकुण ४१ युवक यांना अपर पोलीस अधीक्षक, श्री. बापू बांगर यांनी मार्गदर्शन करून कोल्हापूर व औरंगाबाद येथे प्रशिक्षणाकरीता जाण्यासाठी हिरवा झेंडा दाखवून पोलीस वाहनातून सर्व युवकांना रवाना केले.



उंच भरारी योजने अंतर्गत सातारा जिल्हा पोलीस व प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन प्रशिक्षण संस्था सातारा यांचे संयुक्त विद्यमानाने १. दुचाकी रिपेअरिंग / मैकनीकल, २. हॉटेल मॅनेजमेंट व ३. असिस्टंट इलेक्ट्रीशियन या कोर्सचे प्रशिक्षणाकरीता कोल्हापूर, भोर, अहमदनगर या ठिकाणी एकुण १०६ प्रशिक्षणार्थीना पाठविण्यात आले असुन मार्च २०२३ मध्ये १० युवकांना फ्लेक्सी आयटीआयचे प्रशिक्षणाकरीता रवाना करण्यात आले आहे. तसेच संचालक, आयडीबीआय ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (RSETI) सातारा यांचेकडुन ३ युवकांना फास्ट फुडचे १० दिवसाचे यशस्वी प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. आज अखेर उंच भरारी योजनेतुन सातारा जिल्हयातील एकुण १६० युवक व युवतींना प्रशिक्षण व नोकरी करीता पाठविण्यात आलेले आहेत. तसेच या योजनेत समाविष्ट झालेल्या इतर युवकांना त्यांच्या आवडीनुसार नोकरी किंवा रोजगार तसेच त्यांना स्वतःच्या व्यवसायाकरीता कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com