पोलीस जाणीव सेवा संघातर्फे पोलिसांसाठी मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन संपन्न…

उपसंपादक-रणजित मस्के
कल्याण :– पोलीस जाणीव सेवा संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष रवी सर फडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली मी महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख संजय शेकोकार सह सचिव भिमराज घाडगे(मा.सहायक पोलीस आयुक्त) ठाणे जिल्हा कार्य अध्यक्ष सुनील दळवी ठाणे जिल्हा प्रमुख अमित जगताप यांनी खडकपाडा पोलीस स्टेशन येथे पोलीस जाणीव सेवा संघ महाराष्ट्र राज्य तर्फे पोलीस बांधवांन साठी मोफत नेत्र तपासणी नि: शुल्क व आयुष हाॅस्पीटल तर्फे बी पी सुगर ई.सी.जी रेन्डम ब्लड शुगर,मोफत सल्ला तसेच स्त्री रोग तज्ञ यांचे आयोजन केले होते.


त्यावेळी दिडशे ते दोन पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची मोफत तपासणी करण्यात आली त्या वेळी पोलीस जाणीव सेवा संघाचे पदाधिकारी दिनेश घडशी व रवी गुप्ता उपस्थित होते.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com