किसान क्रांती संघटना व किसान फाउंडेशनच्या वतीने जागतिक शेतकरी दीनानिमित्त मेळाव्याचे आयोजन…

0
Spread the love

प्रतिनिधी-रेश्मा माने

महाड: किसान क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने दि.23 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता श्री विरेश्वर देवस्थान हॉल येथे जागतिक शेतकरी दीना निमित्त मेळावा व उत्कृष्ट शेतकरी जोडप्यांचा सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष टी. एस देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.

यावेळी महाड विरेश्वर मंदिरापासून ते शिवाजी चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्प हार अर्पण करून लेझीम पथकासह रॅली काढण्यात आली.
यावेळी या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर व महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट