पालघर येथे पशुसंवर्धन विभागा मार्फत कार्यशिबिराचे आयोजन..

प्रतिनिधी-मंगेश उईके
पालघर दि. २३ (जिमाका) :– पशुसंवर्धन विभाग यांच्या मार्फत राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत उद्योजक निर्माण करणे या उद्देशाने एक दिवसाच्या कार्यशिबिराचे आयोजन दि. २४/०७/२०२४ रोजी जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय कोळगाव, पालघर येथे सकाळी 10 ते 6 दरम्यान करण्यात येणार आहे.
प्रशिक्षणाचे फायदे : राष्ट्रीय पशुधन अभियाना अंतर्गत सर्व योजनांची सखोल माहीती, लागणारे कागदपत्र तपशील, DPR तयार करतेवेळी येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी मार्गदर्शन, योजनेच्या अंमलबजावणीसाठी लागणारे आर्थिक पाठबळ व भागभांडवल उभा करणे तथा कर्ज मंजूर बाबत मार्गदर्शन व मदत, विविध बँकांकडून व्याज दरात देण्यात येणाऱ्या सवलती बाबत मार्गदर्शन, पशुपालकांच्या शंकांचे निरसन करण्यात येणार आहे
जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय, पालघर प्रशिक्षण देण्यासाठी बाहेरून तज्ञ मंडळी उपस्थित राहणार आहेत तरी इच्छुकांनी Google Form भरून उपस्थित रहावे व लाभ घ्यावा असे आवाहन डॉ.भुवनेश्वर बोरकर, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त पालघर यांनी केले आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com