सातारा शहर पोलीस अंतर्गत सराईत गुन्हेगाराविरुध्द आगामी निवडणुकाचे अनुषंगाने विशेषकॅम्पचे आयोजन..
उपसंपादक-रणजित मस्के
सातारा :– मा पोलीस अधिक्षक सो. सातारा श्री समीर शेख तसेच मा.अपर पोलीस अधिक्षक सो सातारा श्रीमती आंचल दलाल यांनी सातारा जिल्हयातील गुन्हेगारी कृत्यांना आळा बसविण्याचे अनुषंगाने ठोस पावले उचलली आहेत. त्या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलीस अधिकारी, सातारा विभाग याचे मार्गदर्शनाखाली सातारा शहर पोलीस ठाणेचे पो. नि. राजेंद्र मस्के यांनी दिनांक ०२/०३/२०२४ रोजी सातारा शहर पोलीस ठाणे हद्दीतील शरिरापिरध्द, मालमत्तेविरुध्द, आर्म अॅक्ट, खंडणी, अमंली पदार्थ व इतर गंभीर गुन्हे दाखल असलेले अभिलेखावरील गुन्हेगार यांचे विरुध्द प्रतिबंधक कारवाई तसेच माहिती संकलन गुन्हेगारांचा अभिलेख अदयावत करणेबाबतचे उपक्रमाचे आयोजन करणेत आले.

आगामी निवडणुका, व्हीआयपी व्यक्तीचे दौरे तसेच धार्मिक सण उत्सव शांततेत व सलोख्याचे वातावरणामध्ये पार पडावेत याकरीता कोणत्याही प्रकारचे गैरकृत्यास प्रतिबंध होणेकरीता सदर मोहिम हाती घेण्यात आली.
सदर मोहिमेदरम्यान सातारा शहर पोलीस ठाणे अभिलेखावरील एकुण ७७ गुन्हेगारांच्या हालचाली पडताळणी करुन त्यांची विहीत नमुन्यात माहिती नोंदवुन ती अदयावत करणेत आली. मा. पोलीस अधिक्षक सो, सातारा याचे सुचनाप्रमाणे क्रियाशिल असणारे इसमांविरुध्द योग्य ती प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात आली. तसेच सोशल मिडीयाचा वापर करुन त्याव्दारे समाजात भिती व दहशत निर्माण करणारे गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणारे इसमाना लेखी नोटीस व्दारे समज देणेत आली. प्रत्येक गुन्हेगाराचे डोझियार तयार करणेत आले.
सातारा शहर पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे तसेच गुन्हेगारी कृत्ये करणाऱ्यांना प्रतिबंध व्हावा या हेतुने सदर कार्यवाही करण्यात आलेली आहे. अभिलेखावरील गुन्हेगार यांचे हालचालीवर तसेच त्यांचे सोशल मिडीयावर लक्ष राहणार असुन कोणतेही गुन्हेगारी कृत्य अथवा दहशत पसरविणेचा प्रकार निदर्शनास आलेस त्याचेवर ठोस कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे यापुढे रेकॉवरील क्रियाशिल गुन्हेगार गुन्हेगारीपासुन परावृत न झालेस आणखी ठोस कारवाईला सामोरे जावे लागेल असा निर्वाणीचा इशारा व समज देणेत आली. सदर मोहिम यापुढेही सुरु ठेवणेचे आदेश मा पोलीस अधिक्षक सो सातारा यांनी दिले आहेत.
सदर विशेष कॅम्पचे आयोजन मा पोलीस अधिक्षक सो, सातारा श्री समीर शेख तसेच मा. अपर पोलीस अधिक्षक सो, सातारा श्रीमती आंचल दलाल याचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले, पोनि राजेंद्र मस्के तसेच सातारा शहर पोलीस ठाणेचे बीट अधिकारी, अमंलदार, प्रतिबंधक विभागाचे अमंलदार, डीबीपथकाचे अधिकारी अमंलदार, गोपनिय अमंलदार, दप्तरी यांनी केलेले आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com