सोनोपंत दांडेकर महाविद्यालयामध्ये २५ जुलै रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय महिला रोजगार मेळाव्याचे आयोजन..

0
Spread the love

प्रतिनिधी-मंगेश उईके

पालघर दि. २३ (जिमाका) :– जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पालघर यांच्या मार्फत जिल्ह्यातील कुशल व अकुशल महिला उमेदवाराकरीता दिनांक २५/०७/२०२४ रोजी सोनोपंत दांडेकर महाविद्यालय, पालघर (प) येथे सकाळी १० वा भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. खाजगी क्षेत्रात लहान, मध्यम व मोठ्या कारखान्यांना आवश्यक मनुष्यबळ पुरवण्याकरीता पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा या उपक्रमांतर्गत ऑफलाईन महिला रोजगार मेळाव्याचे आयोजन करून रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सदर रोजगार मेळाव्याचे आयोजन होत आहे.

रोजगार मेळाव्यामध्ये दहावी, बारावी, पदवीधर, आयटीआय इ. उत्तीर्ण महिला उमेदवारांसाठी पालघर जिल्ह्यातील विविध कंपन्याची रिक्तपदे अधिसुचित करण्यात येणार आहेत. याबरोबरच बेरोजगार उमेदवारांना स्वयंरोजगारासाठी मार्गदर्शन करण्यासाठी रोजगार मेळाव्यामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ,, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ हे सहभागी होणार असून उमेदवारांना विविध योजनांची माहिती दिली जाणार आहे. तरी सदर रोजगार मेळाव्याकरीता www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करुन जास्तीत जास्त महिला उमेदवारांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पालघर यांनी केले आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट