योजनांची माहिती उद्योजकांना एकाच व्यासपिठावर उपलब्ध करून देण्यासाठी 20 जुलै रोजी कार्यशाळेचे आयोजन

प्रतिनिधी-मंगेश उईके
पालघर:- दि 18 : उद्योग संचालनालयामार्फत एमएसएमई संदर्भात राज्य आणि केंद्र सरकारची धोरणे आणि उपक्रम याबाबत जागरूकता वाढविण्यासाठी भागधारकांसोबत जिल्हानिहाय कार्यशाळा IGNITE MAHARASHTRA-2024 दिनांक २०/०७/२०२४ रोजी सकाळी 09:30 ते दु. 02:00 वा. सेंट जॉन एज्युकेशन अॅण्ड टेकनिकल कॅम्पस, वेवूर, मनोर रोड, पालघर (पूर्व) येथे आयोजित करण्यात आली आहे.
सदर कार्यक्रमाचे उद्घाटन. जिल्हाधिकारी गोविंद बोडके, यांच्या हस्ते होणार आहे.
महाराष्ट्र राज्याच्या विकासामध्ये महत्वपुर्ण योगदान देणारे सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (एमएसएमई) आहेत. तरी या क्षेत्रावर अधिक भर देऊन या उद्योगांची कार्यक्षमता व उत्पादनक्षमता वाढविणे, राज्यात उद्योजकीय वातावरण अधिक व्यापक करुन रोजगार, स्वयरोजगार संधी मोठ्या प्रमाणात निर्माण करणे, एक जिल्हा, एक उत्पादन उपक्रम व निर्यातवृध्दीस चालना देण्यासाठी तसेच उद्योगाच्या विकासाकरीता राज्य तसेच केंद्र शासनाचे विविध विभागांचे उपक्रम व योजना उद्योग संचालनालयामार्फत राज्यात राबवण्यात येत आहेत.
सर्व योजनांची माहिती उद्योजकांना एकाच व्यासपिठावर उपलब्ध होणाच्या दृष्टीने उद्योग सह संचालक, कोकण विभाग, ठाणे श्रीमती विजू शिससाठ यांचे मार्गदर्शन लाभणार आहेत.महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, उपेंद्र सांगळे यांनी सर्व एमएसएमई क्षेत्रातील उद्योजकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com