पोलीस दादालोरा खिडकी योजनेअंतर्गत आरोग्य तपासणी शिबिर, कार्यक्रमाचे आयोजन,सशस्त्र दूरक्षेत्र बिजेपारचे स्तुत्य उपक्रम…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

गोंदिया :

  🪷 पोलीस अधिक्षक मा. श्री. निखील पिंगळे, यांचे संकल्पनेतून आणि अपर पोलीस अधिक्षक मा. श्री. अशोक बनकर, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी, आमगाव श्री. किशोर पर्वते, यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार पो. ठाणे सालेकसा, श्री. बाबासाहेब बोरसे, यांचे मार्गदर्शनात गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस दादालोरा खिडकी योजनेच्या माध्यमातून आज दि.22-09-2023 रोज शुक्रवारला प्रभारी अधिकारी सशस्त्र दुरक्षेत्र बिजेपार, पोउपनि श्री. पडलवार, आणि आरोग्य विभागाचे डॉ. श्री. विवेक सेट्टी, वैद्यकीय अधिकारी प्राथमीक आरोग्य केंद्र बिजेपार, यांचे उपस्थितीत सशस्त्र दुरक्षेत्र बिजेपार ग्राम पंचायत पांढरवाणी अंतर्गत मौजा खातीटोला येथे पोलीस विभाग व आरोग्य विभाग यांच्या सयुक्त सहभागाने आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. 

⏩  सदरचे आयोजित आरोग्य तपासणी शिबिरात ग्राम डोमाटोला, मरामजोब, ठाकुर टोला, खातीटोला व पांढरवाणी येथील  स्त्री / पुरूष व शालेय विद्यार्थी यांनी सहभाग घेतला होता. सहभागी गावकरी, विद्यार्थी यांची मोफत आरोग्य तपासणी, रक्त तपासणी करुन औषधी वितरीत करण्यात आली. तसेच शालेय विद्यार्थी यांना अल्पोहार देण्यात आला.

 ⏩ सदर आरोग्य तपासणी शिबीरात स. दु. बिजेपार येथील पोहवा नाकाडे, राऊत, नाईक, पोना. नेवारे, पोशि. शहारे, टेंभुर्णीकर, वाढीवे, ई. पोलीस अमलदार, ग्राम पंचायत पांढरवाणी येथील सरपंच संजय उईके, उपसरपंच दिनेश उईके, आरोग्य विभागाचे श्री. सोनकनेर आरोग्य सहाय्यक, श्रीमती बडोले, आरोग्य सहाय्यीका श्रीमती भोंगाडे, मेश्राम, आरोग्य सेवीका व स्टॉफ तसेच आशा वर्कर यांनी मोलाचे प्रयत्न व सहकार्य केले.

   ⏩  सदरचे आरोग्य शिबीर शांततेत व यशस्वी रित्या पार पडला.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट