1 “जुलै” कृषि दिनाचे औचित्य साधून ग्रामीण भागातील शेतकर्‍यांच्या मुलांना पुस्तकांचे वाटप व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन.

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

गोंदिया :-

याबाबत थोडक्यात माहिती अशी की, पोलीस अधीक्षक गोंदिया, श्री. निखिल पिंगळे, यांच्या संकल्पनेतून व अप्पर पोलीस अधीक्षक, गोंदिया (कॅम्प) देवरी, श्री. अशोक बनकर, यांचे मार्गदर्शनाखाली, श्री. संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, देवरी यांचे सहभागातून व मार्गदर्शनात # दिनांक - 01/07/2023 रोजी -  1 "जुलै"  कृषि दिनाचे औचित्य साधून ग्रामीण भागातील शेतकर्‍यांच्या मुलांना पुस्तकांचे वाटप व मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

        या अनुषंगाने श्री. संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, देवरी, ठाणेदार श्री. शरद पाटील पोलिस स्टेशन चिचगड यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थी, शाळा, संस्था, ग्रंथालय व परिसरातील होतकरू विद्यार्थी ज्यांना पुस्तके घेणे शक्य नाही अश्या गरजू विद्यार्थ्यां करीता मदत व्हावी या उद्देशाने जिल्ह्यातील नागरिकांना गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे सोशल मीडियाच्या माध्यमातून मदतीचे आव्हान करून  विद्यार्थ्यांना उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांनी पुस्तकांचे मोफत वाटप करण्यात येईल असे आश्वासन दिले होते. 

     त्या अनुषंगाने आज पहिला टप्यात केंद्रीय जिल्हा परिषद शाळा #आलेवाडा येथे वर्ग 1 ली ते 7 वि, च्या विद्यार्थ्यांना पुस्तकाचं वाटप, श्री. संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी, व ठाणेदार शरद पाटील चिचगड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना पुस्तकांचे जीवनातले महत्व काय आहे, हे लक्षात आणून दिले, तसेच पुस्तक वाचल्याने आपल्या जीवनातील अंधकार दूर करता येतो, मोठ्यामोठ्या थोर पुरुषांनी पुस्तक रूपात आपल्या जिवन संघर्ष मांडला आहे, त्यात प्रामुख्याने डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनात आलेल्या असंख्य अडचणी व त्यांनी पुस्तकरूपी ध्यानातून त्यावर केलेली मात, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून अभ्यास, व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना भविष्यातील आह्वान याबाबतीत योग्य असे मार्गदर्शन केले व पुस्तकरूपाने ग्रंथ विद्यार्थ्यांचा हातात देऊन त्यांना देशाचे उद्याचे तुम्ही भविष्य आहात त्यामुळे पुस्तक वाचणं व " वाचनसंस्कृती " वाढीसाठी भर देणे अशाप्रकारे मार्गदर्शन करून त्या बालमनावर चांगले संस्कार घडावे म्हणुन त्याच्यासोबत विविध ग्रामीण "खेळ" विविध प्रकारचे सांघिक खेळ खेळण्याचा आनंद घेतला  व त्यांना कोणताही मदत लागली तर गोंदिया जिल्हा पोलीस विभागाच्या वतीने सहकार्य करण्यात येईल असे सांगून.
 " पुस्तक मैत्री " ही संकल्पना राबविण्यात यावी यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे असे सांगून बालमनावर योग्य मानसिक व शारिरीक आरोग्य चांगले राखण्यासाठी खेळ व वाचन यांचे जीवनातील महत्व अधोरेखित केले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट