रायगड पोलीस कल्याण निधी वृध्दींगत करण्याकरीता सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन…

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

रायगड : रायगड जिल्हा पोलीस दलांतर्गत पोलीस कल्याण निधी वृध्दींगत करण्याकरीता मा. पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या मान्यतेने दिनांक १५/०३/२०२३ रोजी सायंकाळी १८.०० वाजता पोलीस मुख्यालय
अलिबाग येथील पोलीस परेड मैदानावर “सागर तरंग ” हया सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

पोलीस कल्याण निधी मध्ये शासनाकडील आदेश क्रमांक पोलीस कल्याण निधी सुधारीत नियमावली मधील ८ (ग) (१) अन्वये निधी स्विकारला जातो, ज्यामध्ये काही दानशुर व्यक्ती आपल्यापरिने सहभाग नोंदवितात. सदर प्राप्त रक्कमेचा वापर हा पोलीस अधिकारी / अंमलदार तसेच त्यांच्या कुटूंबीयांकरीता विविध योजनांची अंमलबजावणी करण्याकरीता केला जातो, तब्बल ८ वर्षाच्या प्रदिर्घ कालावधी नंतर रायगड पोलीस दलांतर्गत कल्याण निधीकरीता सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम आयोजीत करण्यामागचा उद्देश नागरीकांच्या मनोरंजना सोबतच पोलीस कल्याण निधी
वृध्दींगत करून त्यामधील प्राप्त रक्कमेच्या सहाय्याने पोलीस दलातील पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच त्यांच्या
कुटुंबीयाकरीता विविध लाभदायक योजनांची अंमलबजावणी करणे हे आहे.

त्यामध्ये,
पोलीस पाल्यांकरीता योजना :-

पुस्तक अनुदान इ. ५वी ते १० वी महाविद्यालय तसेच उच्च शिक्षण घेणा-या पोलीस पाल्यांना
पुस्तक अनुदान दिले जाते.

एकलव्य योजना :
पोलीस अधिकारी / अंमलदार यांच्या पाल्यांना किंवा पती/पत्नी यांना नविन उद्योगधंदा करण्याकरीता सदर योजनेव्दारे आर्थिक मदत केली जाते.

उच्च शिक्षण स्कॉलरशिप :-
पोलीस अधिकारी / अंमलदार यांच्या पाल्यांना उच्च शिक्षणाकरीता
अग्रीम स्वरूपात अनुदान दिला जातो.

बस्ता अनुदान :-
पोलीस अंमलदार यांच्या मुलींना शिक्षण घेण्याकरीता हा अनुदान दिला जातो.

वैद्यकीय अग्रीम : पोलीस अंमलदार व लिपीक यांना त्यांच्या आजारावरील उपचाराकरीता
अग्रीम देण्यात येतो.

गरोदर पोषण व सदृढ बालिका आहार :-
महिला पोलीस अधिकारी व अंमलदार यांना प्रसुती काळात
तसेच मुलगी झाल्यास अनुदान देण्यात येते. ‘

कुटूंब आरोग्य योजना:-
पोलीस अधिकारी / अंमलदार यांच्या वैद्यकीय उपचाराकरीता.

अत्यंविधी अनुदान व सानुग्रह अनुदान :-

सेवेत असताना दिवंगत झालेल्या अधिकारी / अंमलदार यांच्या

अंत्यविधीकरीता तसेच तद्नंतर सानुग्रह अनुदान देण्यात येतो.

‘इतर महत्वाच्या योजना :-
वेल्फेअर मार्फत पोलीस मुख्यालय येथे पोलीस दवाखाना,व्यायामशाळा,
वाचनालय सुरू करण्यात आलेले आहेत तसेच पोलीस अधिकारी/अंमलदार यांच्या करीता विविध आरोग्य शिबीर तसेच प्रशिक्षणांचे आयोजन करण्यात येते.

तसेच पोलीस अधिकारी अंमलदार यांच्याकरीता विसावा विश्रांती गृह, महिला पोलीस अधिकारी / महिला पोलीस अंमलदार यांच्याकरीता विश्रांती गृह, पोलीस अधिकारी क्लब, पोलीस अधिकारी / अंमलदार तसेच त्यांच्या कुंटुंबीयाकरीता पोलीस सबसिडीअरी कॅन्टीन, पोलीस वेल्फेअर पेट्रोल पंप इ.
विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी पोलीस कल्याण निधी मधून करण्यात येते.

सदर कार्यक्रम हा रायगड जिल्हा पोलीस दलांतर्गत आयोजीत असुन साहिल मोशन आर्टस् यांच्या मार्फत
प्रस्तुत केला जाणार असुन कार्यक्रमाची तिकीट विक्री माफक दरान सुरू आहे.

कार्यक्रमामध्ये संगीत, नाट्य, नृत्य आणि हास्याची मेजवानी प्रेक्षकांसमोर सादर करण्यात येणार असुन, कार्यक्रमाव्दारे महाराष्ट्राची लोकपरंपरा जागृत ठेवत मराठमोळया संस्कृतीचा वारसा जपण्यासाठी पुरेपूर नियोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमाकरीता पुष्कर श्रोत्री, नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर, गौरव मोरे, दत्तु मोरे, श्रमेश, प्रथमेश, मीरा जोशी, नवीन प्रभाकर इ. अशा दिग्गज कलाकारांची मांदीयाळी पाहावयास मिळणार आहे

तरी, रायगड जिल्हा पोलीस दलातर्फे सर्व नागरीकांना विनंती, कार्यक्रमाच्या तिकीटाकरीता रायगड जिल्हयातील नजीकच्या पोलीस ठाणेस संपर्क साधवा. आपण सदर कार्यक्रमाकरीता आपला जास्तित जास्त सहभाग नोंदविण्याबाबत मा. श्री. सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक रायगड व मा. श्री. अतुल झेंडे, अपर पोलीस अधीक्षक रायगड तसेच रायगड जिल्हा पोलीस परिवारातर्फे आवाहन करण्यात येत आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट