घोडबंदर रोडवर गायमुख घाटात रस्ता दुरुस्तीमुळे जड, अवजड वाहनाची वाहतुक बंद करण्याचे आदेश जारी..

0
Spread the love

प्रतिनिधी – अक्षय कांबळे

ठाणे :– मिराभाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात दि. २४/०५/२०२४ ते दि. ०७/०६/२०२४ रोजी पावेतो सार्वजनिक बांधकाम विभाग ठाणे कडुन घोडबंदर रोडवर गायमुख घाटात रस्ता दुरुस्तीचे काम करण्यात येणार असून त्यावेळेस घोडबंदर रोडवर जड, अवजड वाहनांची वाहतूक बंद करावी लागणार आहे. तरी जनतेची गैरसोय होवू नये याकरिता आम जनतेच्या सोईसाठी, वाहतूक नियंत्रण अधिसुचना जारी करुन जड, अवजड वाहनांना खालील प्रमाणे प्रवेश बंद करण्यात येत आहे.

प्रवेश बंद- १)राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ – • अहमदाबाद, गुजरात कडुन ठाणे, नवी मुंबई येथे | जाणाऱ्या जड – अवजड वाहनांसाठी घोडबंदर रोड काजूपाडा, गायमुख मार्गे प्रतिबंध करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग :- मनोर (टेन नाका) येथून डावे वळण घेवुन पोशेरी-पाली-वाडा नाका – शिरीष पाडा येथून अंबाडी, भिवंडी मार्गे इच्छित स्थळी जातील.

प्रवेश बंद- २ ) राष्ट्रीय महामार्ग क्र. ४८- पालघर – वसई बाजूकडून येणा-या वाहनांना चिंचोटी | नाक्यापासून वरसावे बाजूकडे येण्यासाठी प्रवेश बंद

पर्यायी मार्ग :- चिंचोटी मार्गे- कामन- खारबांव- अंजूरफाटा, भिवंडी मार्गे इच्छित स्थळी जातील.

प्रवेश बंद :- ३) पश्चिम द्रुतगतीमार्ग मुंबई व काशिमीरा बाजूकडून घोडबंदर रोड, ठाणे करीता जाण्यासाठी प्रवेश बंद करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग:- सदर वाहने वर्सोवा ब्रिजवरुन सरळ राष्ट्रीय महामार्गावरुन चिंचोटी फाटा ते कामन – अंजूर फाटा- भिवंडी मार्गे इच्छित स्थळी जातील.

हलके वाहनांसाठी :- गायमुख घाटात घोडबंदर- ठाणे वाहिनीवर काम करताना काजूपाडा कडून | ठाणेच्या दिशेने जाणाऱ्या हलक्या वाहनांची वाहतूक इंडियन पेट्रोलपंप जवळील कटमधून ठाणे – वरसावे वाहिनीवर रॉग साइडने येऊन पुढे निराकेंद्र समोरील | कट मधून गायमुख वरुन इच्छित स्थळी जातील.


सदरची वाहतूक अधिसुचना ही पोलीस वाहने, फायरब्रिगेड, रुणवाहिका, ऑक्सीजन बाहुन नेणारे वाहने व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहने यांना लागू होणार नाही. सदरची वाहतूक अधिसुचना ही काम पुर्ण होई पर्यंत अंमलात राहील.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट