या वर्षी ऑक्टोबर दिवाळी ही समाधानकारक जाणार..!

0
Spread the love

उपसंपादक-उमेद सुतार

पुणे :- दिवाळी आली कि खरेदी विक्रीला जोर धरतो, बाजारपेठेत गर्दी होते, जवळपास दीवाळी निमित्ताने 100/150 विविध ट्रेड यांना मोठ्या प्रमाणात व्यवसाय मिळतो, भारत देशातील सर्वात मोठा सण व व्यापारी दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण सण म्हणून ओळखला जातो, वर्षांनुवर्षांचा अनुभवाने नोव्हेंबर मधे आलेल्या दिवाळीत व्यवसाय थोडा जास्त होतो, बाजारपेठेत मालाची मागणी वाढते, तसेच वातावरणाचा ही फरक पडतो, ओला दुष्काळ सुका दुष्काळ याचा ही परीणाम होतोच, आणि ऑक्टोबर दिवाळी ही महीणा अखेरीला येत असल्याने तशी ऑक्टोबर दिवाळी मध्ये साधारण 30% व्यवसाय कमी होत आसतो, परंतु या वर्षी ऑक्टोबर दिवाळी आसुन देखील समाधानकारक होईल असा अंदाज आहे, कारण एकतर या वर्षी पाऊस देखील समाधानकारक झालेला आहे, दुसरे म्हणजे राज्यात निवडणूकीचे वातावरण सुरू आहे, त्या मुळे ही दीवाळी अपवाद वगळता व्यापारी नागरीक यांना समाधानकारक नक्कीच जाणार असे वातावरण आहे.

कोरोणा काळ व त्या नंतर एक वर्ष दिवाळीत व्यवसाय हा किरकोळ व्यापारात खुपच खालावला होता, ग्राहक हा ऑनलाईन तसेच मल्टीनॅशनल कंपन्यांनकडून खरेदीत वाढ झालेली दिसत होती, त्या नंतर गेल्या वर्षी व यंदाच्या वर्षी देखील स्थानिक पातळीवर जनजागृती तसेच विदेशी कंपन्यांन कडून ग्राहक खरेदी नाकारून स्थानिक बाजारपेठेत जाऊन खरेदीला महत्व देताना दिसत आहेत, वोकल फाॅर लोकल शाॅप्स स्थानिक उत्पादक उद्योजक तसेच किरकोळ व्यापारी यांना महत्व दिले जात आहे, आपल्या देशाचा चा पैसा देशात रहावा या साठी छोट्या छोट्या घरगुती महीला उत्पादक छोटे व्यवसायीक यांच्या कडून खरेदीला महत्व दिले जात आहे, व्यापारी देखील माल मागवता देशातील विविध भागातून मागवताना दिसत आहेत, विदेशी चायना सारख्या देशाकडून मालाची मागणी कमी झालेली दिसत आहे, गणपती नवरात्र उत्सव तसेच दिवाळी निमित्त चायना वरून माल कमी मागविण्यात आला, चायना वरून 1 लाख करोड चा मालाची आवक कमी झाल्याचा अंदाज आहे, मोठ मोठ्या माॅल मध्ये व ऑनलाइन तसेच मल्टीनॅशनल कंपन्यांनकडून वजना मध्ये काॅलेटी मध्ये किंमतीचा फरक करून ग्राहकांची फसवणूक केल्याच्या घटना वारंवार घडत आहेत, आणि आता ग्राहक व व्यापारी वर्गाला कळून आले आहे कि संकटाची वेळ आली कि स्थानिक व्यापारी व स्थानिक नागरीकच एकमेकांना उपयोगी पडतात ,आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्थानिक उत्पादक उद्योजक किरकोळ व्यापारीच सरकार टॅक्स स्वरूपात पैसे भरतात, परंतू या विदेशी कंपन्या मल्टीनॅशनल कंपन्यांनकडून देशातील टॅक्स ची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जाते हे दिसुन आले आहे.

9764082353
सचिनभाऊ दिनकर निवंगूणे, अध्यक्ष
काॅन्फरडेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स कॅट महाराष्ट्र राज्य

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट