ऑनलाईन फसवणूक झालेली रक्कम सायबर सेलच्या मदतीने मिळाली परत…!

0
Spread the love

उपसंपादक- रणजित मस्के

नंदुरबार ४ लाख २० हजारांपैकी ३ लाख ४ हजार रुपये न्यायालयाच्या आदेशाने झाले खात्यावर जमा.

नंदुरबारातील एकाचे ऑनलाइन फसवणूक झालेले चार लाख २० हजार रुपयांपैकी तीन लाख चार हजार रुपये परत मिळवून देण्यात नंदुरबार पोलिस दलाच्या सायबर क्राईम सेलला यश आले.

न्यायालयाच्या आदेशाने ती रक्कम नुकतीच तक्रारदाराला देण्यात आली.

नंदुरबारातील गॅस एजन्सी कार्यालयात वर्षभरापूर्वी दीपक शिंदे यांची फसवणूक झाली होती. एका बँकेचे ऑनलाइन अॅप्लिकेशन चालू होत नसल्याने गुगलवरून कस्टमर केअरचा नंबर घेत संपर्क केला असता समोरून एनी डेस्क नावाचे अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगण्यात आले. त्याआधारे समोरच्या व्यक्तीने मोबाइलचा ऑनलाइन ताबा तक्रार केली. थेट शिंदे यांच्या खात्यातून चार लाख २० हजार रुपये ऑनलाइन काढून घेण्यात आले.

ऑनलाईन फसवणूक झालेली रक्कम परत मिळाल्याने पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील व सायबर सेलचे निरीक्षक किरणकुमार खेडकर यांचा सन्मान करून आभार मानतांना तक्रारदार दीपक शिंदे.

शिंदे यांनी लागलीच पोलिस दलाच्या सायबर सेलमध्ये जाऊन पैसे परत मिळताच दीपक यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयात जाऊन पोलिस अधीक्षक पी. आर पाटील, सायबर सेलचे निरीक्षक किरणकुमार खेडकर यांचे आभार मानत त्यांचा सन्मान केला. यांशिवाय सायबर सेलचे कर्मचारी यांनी तातडीन पाठपुरावा करून फसवणूक झालेली कारवाई करून पाठपुरावा केल्यानेच रक्कम गोठवली.

सायबर सेलने लागलीच संबंधित वॉलेट, बँकेशी समन्वय साधून व हजार रुपये खाते गोठवल्याने ती रक्कम परत करण्यात आली.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट