रेडी मिक्स काँक्रीट ट्रक पलटी होऊन एका कामगाराचा मृत्यू,, तर एक जण गंभीर जखमी..
उपसंपादक-राकेश देशमुख
महाड:-महाड तालुक्यातील गोंडाळे देऊळकोंड येथील घटना,, नक्की या अपघाताला जबाबदार कोण पोलिसांकडून
तपास सुरू…!
महाड तालुक्यामध्ये रस्त्याचे काम चालू असताना अनेक अपघात व दुर्घटना घडल्याचे प्रकार घडले आहेत. याचेच एक जिवंत उदाहरण म्हणजे आज दुपारच्या सुमारास महाड तालुक्यातील गोंडाळे देऊळकोंड येथे रेडी मिक्स काँक्रीट ट्रक पलटी होऊन एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. या ठिकाणी सिमेंट काँक्रीटचे बंधारा बांधण्याचे काम सुरू असताना अचानक काँक्रीट मिक्सर ट्रक पलटी झाला व यामध्ये एका कामगाराचा चीरडून जागीच मृत्यू झाला तर एक कामगार गंभीरित्या जखमी झाला आहे. मैलोद्दीन अन्सारी असे मयत व्यक्तीचे नाव असून सुमित ढाले ही व्यक्ती गंभीरित्या जखमी झाली आहे. घटनास्थळी महाशक्ती ॲम्बुलन्स दाखल झाली असून जखमींना अधिक उपचारांकरीता रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. महाड उपविभागीय अधिकारी शंकर काळे व त्यांची संपूर्ण टीम अपघातास्थळी पोहोचली असून पुढील तपास सुरू आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com