मा. पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांच्या विशेष पथकांकडुन अवैध दारु विक्री करणारे हॉटेल चालक व जुगार अडयावर धाड टाकून 7,40,000/- रुपयांचा मुद्देमाल केला जप्त …

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

छत्रपती संभाजीनगर:- याअनुषंगाने मा. पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनानुसार विशेष पथक हे अवैध धंद्यावरती कारवाई करण्याचे अनुषंगाने जिल्हयात गस्त घालत असतांना विशेष पथक प्रमुख यांना गोपनीय माहिती मिळाली कि, वेरूळ जवळील शार्दुलवाडी परिसरात काही ईसम हे शेतात पत्यावर तिर्रट नावाचा जुगार खेळत व खेळवीत असल्याची माहिती मिळाली होती.

यावरून पथकांने दिनांक 09/01/2024 रोजी रात्री 00: 15 वाजेच्या सुमारास छुप्या पध्दतीने शार्दुलवाडी येथील अमजत बिसमिल्ला खान यांचे शेतात पाहणी व पडताणी केली असता तेथे काही अतंरावर दुचाकी, अॅटो रिक्षा अशी वाहने पार्किक केलेली दिसुन आली. तसेच शेतातील बंद खोलीच्या बाजुला असलेल्या लिंबाच्या झाडाखाली छोटया लाईट बल्ब च्या उजेडात काही इसम हे पैशावर पत्याचे सहय्याने जुगार खेळतांना दिसून आली.

यावरुन पथकांनी अचानक घेराव टाकुन छापा टाकला असता पोलीसांचे अचानकच्या कारवाईने जुगारी ईसमांची धांदल उडाली व यातील काही ईसम हे मिळेल त्या रस्त्याने अंधाराचा फायद्या घेवून सैरावैर पळत सुटले परंतु तरीही पथकातील पोलीसांचे पथकांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले.

या संपूर्ण कारवाईत ०८ जुगारी ईसामांना ताब्यात घेण्यात आले आहे. नुमद कारवाई मध्ये रोख 25830/- रुपयांसह दुचाकी वाहने, तीन चाकी ऑटो रिक्षा, मोबाईल फोन, पत्ताचे केंट, इतर जुगाराचे साहित्य असे एकूण 701830/- रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नमुद आरोपीविरुध्द पोलीस ठाणे खुलताबाद येथे गुन्हा दाखल केला तसेच याचप्रमाणे विशेष पथकाला माहिती मिळाली कि, पोलीस ठाणे शिवुर हवीतील मनूर येथील हॉटेल पवन मराठा येथे मोठ्या प्रमाणावर चोरटया मार्गाने अवैधरित्या ग्राहकांना देशी विदेशी दारुची सरास विक्री होत आहे. या माहितीच्या आधारे पथकाने मनूर येथे दिनांक 09/01/2024 रोजी सकाळी 06:30 वाजेला मिळालेल्या माहितीच्या हॉटेल पवन मराठा परिसरात सापळा लावला.

यावेळी नमुद हॉटेल मध्ये संशयीत हालचाल दिसुन आल्यानंतर पथकाने अचानक छापा मारला असता हॉटेल परिसरता देशी व विदेशी दारूच्या 180 मिली व 90 मिली च्या सुमारे 665 बॉटल ज्यांची किंमत 37,800/- रुपयांचा लपवून ठेवलेला मिळून आला आहे. अवैध विक्री करण्यासाठी लपवून ठेवलेल्या सर्व दारू बॉटल जप्त करण्यात आले असून हॉटेल चालकाविरुद्धयाचे विरुध्द पोलीस ठाणे शिवुर येथे महाराष्ट्र दारूबंदी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस ठाणे शिवुर करित आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट