22- पालघर (अ.ज) लोकसभा मतदार संघासाठी नामनिर्देशिनपत्र दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी 2 उमेदवारांचे 2 नामनिर्देशनपत्र दाखल..

0
Spread the love

प्रतिनिधी- मंगेश उईके

पालघर :– पालघर दि. 29 : 22- पालघर (अ.ज.) लोकसभा मतदार संघासाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी राजेश पाटील यांच्या वतीने 1 नामनिर्देशनपत्र दाखल केला असून आतापर्यंत श्री. पाटील यांनी 2 नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत.

मीना किशोर भड (बहुजन मुक्ती पार्टी) यांनी 1 नामनिर्देशनपत्र दाखल केले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद बोडके यांनी दिली.

आज नामनिर्देशनपत्र घेऊन गेलेल्या पक्ष/प्रतिनिधी पुढीलप्रमाणे : शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)-04, आंबेडकर राईट पार्टी ऑफ इंडिया-02, वंचित बहुजन आघाडी -02, जिजाऊ विकास पार्टी-02, बहुजन विकास आघाडी -04, भारतीय जनता पार्टी -03, नॅशनल काँग्रेस पार्टी -02 अपक्ष-03 अशी एकुण 22 नामनिर्देशन पत्रे राजकीय पक्षाच्या प्रितिनिधी यांनी घेऊन गेले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट