जागतिक महिला दिनानिमित्त सातारा जिल्हा पोलीस दलाचे वतीने महिलांचा विशेष सन्मान…

उपसंपादक – रणजित मस्के

सातारा :- मा. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व मा.बापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली आज दिनांक ०८/०३/२०२३ रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सातारा जिल्हा पोलीस दलाचे वतीने शिवतेज हॉल सातारा येथे मा. श्रीमती शितल जानवे खराडे पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी बाई विभाग यांचे प्रमुख उपस्थितीत जागतिक महिला दिनाचे आयोजन भरोसा सेल स्थागुशा सातारा यांचे वतीने करणेत आले होते. सदर कार्यक्रमास श्री. पाटील पोलीस उपअधीक्षक (गृह) सातारा व सातारा पोलीस पब्लिक स्कुल सातारा च्या मुख्याधीपिका श्रीमती स्नेहांकिता पवार व सातारा जिल्हयातील एकूण १२५ ते १५० महिला पोलीस अधिकारी व महिला अंमलदार उपस्थित होते.


नमुद कार्यक्रमा दरम्यान उपस्थित सर्व महिला अधिकारी व अंमलदार यांना महिला दिनानिमित्त शुभेच्छा व गुलाब पुष्प देण्यात आले. तसेच महिला दिनाचे औचित्य साधून सातारा पोलीस दलातील उत्कृष्ट कामगिरी केलेल्या एकूण १ महिला पोलीस अधिकारी व १५ महिला अंमलदार यांना प्रशंसापत्र देवून सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर सातारा पोलीस कल्याण विभाग व जनरल प्रॅक्टीशनर असोशिएशन सातारा यांचे संयुक्त विदयमाने सातारा पोलीस दलातील महिलांचे आरोग्यविषयी शिबीर घेण्यात आले त्यामध्ये जनरल प्रॅक्टीशनर असोशिएशन सातारा यांचे कडील डॉ.वृंदा कुलकर्णी व त्यांचे पथक यांनी महिला पोलीस अंमलदार यांचे दैनंदिन आरोग्यविषयक तपासणी करून मार्गदर्शन केले.



कार्यक्रमामध्ये सत्कारमुर्तींनी व उपस्थितीत महिला पोलीस अंमलदार यांनी आपले मनोगत व्यक्त करुन
अशा उपक्रमांमुळे दैनंदिन कामकाज करण्याकरीता प्रोत्साहन मिळाले असे सांगितले.
सदरवेळी मा. पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग वाई श्रीमती शितल जानवे खराडे मा. पोलीस उपअधीक्षक (गृह) सातारा श्री. पाटील यांनी उपस्थितींना मार्गदर्शन केले. सदरचा जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com