जागतिक रक्तदाता दिनानिमित्त पोस्को महाराष्ट्र कंपनीमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन व नियमित रक्तदात्यांचा सन्मान…

0
Spread the love

प्रतिनिधी :-सचिन पवार

माणगांव : रायगड :- माणगांव :-१४ जून जागतिक रक्तदाता दिनानिमित्त पोस्को महाराष्ट्र स्टील कंपनी मध्ये १२ व्या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. तसेच नियमित रक्तदात्यांचा सन्मान पोस्को चे उपव्यवस्थापकीय संचालक श्री. इन क्यो बे यांच्या शुभहस्ते प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह देऊन करण्यात आला. कार्यक्रमाची सांगता रक्तदानाची शपथ घेऊन करण्यात आली.नियमित रक्तदान शिबिराचे आयोजन केल्याबद्दल जनकल्याण रक्त केंद्र महाड चे व्यवस्थापक श्री. महेश मोरे यांनी पोस्को कंपनी प्रशासनाचे आभार मानले व नियमित रक्तदान करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे सन्मान केल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

सन्मानित कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त करत, रक्तदान करण्यासाठी इतर कर्मचाऱ्यांनाही प्रोत्साहन देण्याचे आश्वासन दिले तसेच ही संधी निर्माण केल्याबद्दल कंपनी प्रशासनाचे देखील आभार मानले.आज एकूण ६९ कर्मचाऱ्यांनी या शिबिरात सहभाग नोंदवला आणि स्वेच्छेने रक्तदान केले. ज्यांना रक्ताची गरज आहे त्यांच्यासाठी या उपक्रमामुळे मोठा हातभार लागणार आहे. अशा सातत्यपूर्ण शिबिराचे आयोजन करून रक्तदान करू इच्छिणाऱ्या कर्मचाऱ्यांना संधी निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे पोस्को महाराष्ट्राचे मत आहे. महाराष्ट्रात रक्तदानाची चळवळ नवीन नाही पण तरीही ऐच्छिक रक्तदान पुरेसे नाही त्यामुळे अशा शिबिरांची आणि रक्तदात्यांची संख्या नियोजनबद्ध पद्धतीने वाढवणे आवश्यक आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट