सन्मा. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त नायगांव येथे गुणवंत विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिक सन्मान सोहळा संपन्न…

संपादिका : दिप्ती भोगल
नायगांव :– शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मा. श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नायगाव पूर्व विभागाच्या सौजन्याने अनेक कार्यक्रम संपन्न होत आहेत.

त्यापैकी ५ वी ते १२ वी मधील गुणवंत विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन दिनांक २३ जुलै २०२४ रोजी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय जूचंद्र येथे करण्यात आले
होते.




















सदर कार्यक्रम श्री. पंकज देशमुख (पालघर जिल्हा प्रमुख), श्री. विजयशेठ पाटील( सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी), सौ. किरण चेंदवणकर मॅडम (पालघर जिल्हा महिला संघटक), श्री. जनार्दन म्हात्रे (उपजिल्हाप्रमुख पालघर), श्री. विवेक पाटील (जिल्हा सचिव, पालघर), श्री. हरिहर पाटील( तालुका प्रमुख, ग्रामीण), श्री. किरण म्हात्रे( शहर प्रमुख, नायगाव पूर्व), श्री. केदारनाथ पाटील( मा. अध्यक्ष, चंडिकादेवी न्यास), श्री. सुरेश भोगले( उपशहर प्रमुख, नायगाव पूर्व), श्री. उमेश नाईक(उपशहर प्रमुख, नायगाव पूर्व), सौ. चरणा म्हात्रे ( महिला शहर संघटक, नायगाव पूर्व), श्री. मोहन पाटील( शाखाप्रमुख जूचंद्र), श्री. मंगेश चव्हाण (शाखाप्रमुख, परेरा नगर), श्री. सुनील मिश्रा (युवासेना वसई संघटक) तसेच शिवसेना व युवासेनेचे सर्व पदाधिकारी, शिवसैनिक आणि ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
याप्रसंगी विद्यार्थ्यांच्या गुणगौरवाबरोबरच ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळा पार पडला. या कार्यक्रमाचे नियोजन विभागप्रमुख श्री. हृदयनाथ भोईर यांनी केले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com