पुरंदर: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त कुंभारवळण व जाधववाडी या ठिकाणी जि.प.प्रा.शाळेत छत्री वाटप व खाऊ वाटप…

उपसंपादक-रणजित मस्के

पुणे :
सत्यशोधक, साहित्यसम्राट, शिवशाहीर, लोकशाहीर. अण्णाभाऊ साठे यांच्या 103 व्या जयंतीनिमित्त तसेच मा. काशिनाथअण्णा यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जाधववाडी, ता. पुरंदर, जिल्हा पुणे. या ठिकाणी अंगणवाडी तसेच इयत्ता पहिली ते चौथी च्या विद्यार्थ्यांना 50 छत्री वाटप, बाल चिमुकल्यांसाठी खाऊ वाटप, बहुजन मुक्ती पार्टी आणि प्रहार अपंग क्रांती संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.


राज्यात सध्या जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होत आहे. खाजगी शाळांचा वाढणारा आकडा तसेच तिथे प्रत्येक विद्यार्थ्याला लागणारी फी ही लाखो रुपयाच्या पटीत असते. जिल्हा परिषद शाळेचे शिक्षण दर्जेदार होण्यासाठी सामाजिक, राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी अशा प्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम जिल्हा परिषद शाळेमध्ये राबवणे तितकेच गरजेचे झालेले आहे.











जिल्हा परिषद शाळेची घटत असलेली संख्या ही परत त्याच जागेवर आणण्याची ही एक नाविन्यपूर्ण संधी पुरंदर तालुक्यामध्ये राबवण्यात येत आहे. असे वेगवेगळे उपक्रम राबवून जिल्हा परिषद शाळेचा दर्जा वाढवण्यात एक मोलाची मदत या कार्यक्रमांच्या माध्यमातून मौलाचा दगड ठरत आहे. आपणही देशाचं देणं लागतो या संकल्पनेतून यापुढेही बहुजन महापुरुष व बहुजन महामाता यांच्या जयंतीच्या निमित्ताने असे वेगवेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम यापुढेही पुरंदर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर घेण्याचे भविष्यातील नियोजन बहुजन मुक्ती पार्टी तसेच प्रहार अपंग क्रांती संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने घेणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.



यावेळी बहुजन मुक्ती पार्टी पश्चिम महाराष्ट्र सोशल मीडिया प्रभारी तथा पुणे जिल्हा महिला प्रभारी सुनीता कसबे, प्रहार अपंग क्रांती संस्था पुरंदर तालुका काशिनाथ अण्णा जगताप संपर्क प्रमुख, अश्विनी गायकवाड बहुजन मुक्ती पार्टी व प्रहार अपंग क्रांती संस्था पुरंदर तालुका महिला आघाडी अध्यक्षा, हनूमंत नेटके तालुका विभाग प्रमुख, इम्रान इनामदार पुरंदर तालुका सचिव, चंद्रकांत कसबे सभासद, सोहेल इनामदार सामाजिक कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com