महाडमध्ये श्री दत्त जयंती जन्मोत्सव सोहळा निमित्त विविध कार्यक्रमाचे अती उत्साहवर्धक असे आयोजन…

प्रतिनिधी-रेश्मा माने
महाड:
महाड दादली किंजलघर येथे मिती मार्गशीर्ष शु. शके १९४४ अर्थात श्री दत्त जंयती जन्मोत्सव सोहळा संपूर्ण तालुक्यात प्रचंड उत्साहात तेवढ्याच भक्ती भावात साजरी करण्यात आली.
बुधवार दिनांक 7 डिसेंबर 2022 रोजी पहाटे पासून सर्वत्र दिंगबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिंगबराच्या जयघोषात आबाल वृद्धांसह दिवसभर दत्तपूजा विविध धार्मिक कार्यक्रमाद्वारे श्री दत्त जयंती जन्मोउत्सव सोहळा साजरा करण्यात आला.
तालुक्यांतील शेंदूरमलई ,वरंडोली, किंजळघर, करंजखोल आदी ठिकाणी श्री दत्त जयंती जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला.


पहाटे गुरुमूर्तीवर अभिषेक पादूका पूजन होमविधी महाआरती महा प्रसाद हरिपाठ ( महिला मंडळ ) श्रीदत गुरु जन्मोत्सव विधी सामुदायीक आरती ह भ . प . महाराजांचे किर्तन हरिजागर असे मध्य रात्रीपर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन या श्री दत जयंती जन्मोत्सव सोहळ्यात करण्यात आले आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com