रक्षाबंधना निमित्त वर्दितले पोलीस भाऊ कोल्हान गावातील भगिनिंच्या भेटीला…!

प्रतिनिधी, सचिन पवार
माणगांव रायगड
सध्या देशभरात व राज्यात रक्षा बंधनाचा सण मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे. आपले पोलीस बांधव यांना दररोजचा बंदोबस्त,घडणारे वेगवेगळ्या प्रकारचे गंभीर गुन्हे आणि कायदा सुव्यवस्था राखताना आपल्या बहिणी कडे जाऊन सण साजरा करू शकत नाहीत.
त्यामुळे सामाजिक कामाचे निमित्ताने जवळीक झालेले कोल्हान गावात असलेल्या भगिनींना भेटण्यासाठी गेले व गावातील भगिनींनी पोलिसांनाच राखी बांधून अत्यंत उत्साही वातावरणात रक्षाबंधन सण साजरा केला.

शुक्रवार दिनांक १ सप्टेंबर रोजी माणगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी हे संध्याकाळी ८ वा. माणगांव पोलीस ठाणे हद्दीतील कोल्हान या गावात भेटीला गेले. यावेळी महिलांनी पारंपरिक वेश भूषा करून सर्व वयोगटातील महिलांनी पोलीसांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा केला. यावेळी पोलीसांना गहिवरून आले. आम्हाला गावातील महिलांनी आपले पणाने राखी बांधून सण साजर केला. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीसांना गावाला जाता आले नाही पण या बहिणींनी राखी बांधली म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. पोंदकुले व पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी कृतज्ञता व आभार मानले.
यावेळी गावातील योगिता वाडवळ यांनी चौकामध्ये उभा आहे वर्दितला माणूस म्हणून सण साजरे करतोय गर्दीतला माणूस असे सांगून पोलीसांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्व महिलांनी आम्हाला तर हा कार्यक्रमच संपवू नये असा वाटत आहे, घरी सुद्धा जायचं मन होत नाहीये अशी भावना व्यक्त करत होत्या.
तसेच येथून पुढे पण पोलीस बाधवांची बदली झाली तरी त्यांना प्रत्येक वर्षी राख्या पाठविणार असल्याचे गावातील महिलांनी ठरवले आहे.

सदर कार्यक्रमास कोल्हान गावातील महिला जयश्री वाडवळ, योगिता वाडवळ, मुक्ताबाई वडवळ, रेवती वडवळ,श्र्वेता सं. कडवेकर,सुगंधा कळंबे, संगीता कडवेकर, आशा वाढवळ, तसेच ग्रामस्थ राजेंद्र वाडवळ, मारुती साखरे, सीताराम सुतार, विनायक वाडवळ ,विजय वाडवळ, सुमित करकरे प्रशांत सुतार, बड्डेश वाडवळ, समीर वाडवळ नथुराम वाढवळ तसेच माणगाव उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. पोंदकुळे, पो. नि श्री. राजेंद्र पाटील, सहा. पोलीस निरीक्षक सतिष आस्वर, पोलीस उप निरीक्षक श्री किर्तिकुमार गायकवाड, दिनेश आघाव, स. फोज चव्हाण, पो शि रामनाथ डोईफोडे, संदीप सानप, मयूर उभारे, मयूर पाटील, नाथा दहिफळे व इतर माणगाव पोलीस स्टेशन कडील कर्मचारी असे ४० ते ५० जन हजर होते.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com