नाशिक मध्ये राष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिलांना विशेष प्रमाणपत्र देऊन सन्मानित…

उपसंपादक-रणजित मस्के
नाशिक:-राष्ट्रीय महिला दिनानिमित्त नाशिक राष्ट्रीय अपराध नियंत्रण संस्थेचे राष्ट्रीय मीडिया प्रभारी उमेद सुथार यांच्या सूचनेनुसार नाशिक जिल्हाध्यक्ष रमेशगिरी गौसावी यांच्या हस्ते पोलीस मित्र संघटनेच्या महिला अधिकारी व सदस्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
सत्कार समारंभ प्रसंगी सातपूर पोलीस ठाण्यातील महिलांचा गौरव करण्यात आला.पोलीस उपनिरीक्षक अश्विनी उबाळे मॅडम तसेच पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत संघटनेच्या नाशिक जिल्हा महिला अध्यक्षा संगीताताई शिंदे, नाशिक जिल्हा उपाध्यक्ष महिला ज्योतीताई भोसले, नाशिक जिल्हा कार्याध्यक्षा डॉ. दीपाली पाठक, नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष गौरव शिंपी, नाशिक जिल्हा नगरसेविका हर्षाताई शिंपी, चित्रा गोसावी आदी उपस्थित होते.
संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील कुमार अत्री, राष्ट्रीय चेयरमैन अमन गुप्ता यांनी या कार्याचे कौतुक करून सर्व महिलांना राष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com